छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २० ते २४ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते २८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७९ ते ९२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. १९ सप्टेंबर २०२५
रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह जोरदार तर दि. २०,२२ व २३ सप्टेंबर
२०२५ रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या
पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २४ ते ३० सप्टेंबर २०२५
दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल तापमान व
किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
वाढीची ते कांडे धरणे अवस्था
ऊस पीकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. मागील काही दिवसातील ढगाळ
वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे ऊस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी लिकॅनीसिलीयम
लिकॅनी या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी. तसेच ऊस
पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
मोनोक्रोटोफॉस ३६ एस एल १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी.
कापूस
फुलधारणा ते बोंड लागणे/
बोंड वाढीची अवस्था
कापूस पीकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. मागील काही दिवसात
झालेल्या पाऊस व वाढलेली आर्द्रता यामुळे कापुस पीकामध्ये बोंडसडीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
पायराक्लोस्ट्रोबिन २० टक्के प्रति १० ग्रॅम किंवा मेटिराम ५५ टक्के +
पायराक्लोस्ट्रोबिन ५ टक्के (पूर्वमिश्रीत बुरशीनाशक) २० ग्रॅम किंवा प्रोपिनेब ७०
टक्के प्रति २५ ते ३० ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मका
दाणे भरणे ते कणसे वाढीची
अवस्था
मका पीकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरणामुळे मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के
एसजी ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५
टक्के एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी. फवारणी करत असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे
फवारणी करावी.
तूर
वाढीची अवस्था
तूर पीकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे तुर पीकामध्ये
पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादूर्भाव प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी किंवा थायामेथोक्साम २५ टक्के
डब्ल्युजी ४ - ५ ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळुन पावसाची उघाड बघून
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच तूर पिकात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा जैविक
बुरशीनाशके ४ लिटर प्रति एकर या
प्रमाणात घेवून आळवणी करावी.
सिताफळ
फळवाढीची अवस्था
सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करुन घ्यावीत. काढणीनंतर सिताफळ
प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत. तसेच सिताफळ बागेत पिठ्या ढेकूण या
किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास बागेत झाडांच्या बुध्यां भोतवतालच्या तणांचे
व्यवस्थापन करावे तसेच व्हर्टिसिलियम लिकॅनी ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फळधारणा ते फळवाढीची अवस्था
भाजीपाला पीकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे मिरची पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत शेळ्यांमध्ये
जुलाब/हगवण लागल्याचे दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर
पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे.
इतर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. १९ सप्टेंबर २०२५
रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह जोरदार तर दि. २०,२२ व २३ सप्टेंबर
२०२५ रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या
पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवांनी पीकांमध्ये व फळबागेतील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी
तसेच पाऊस चालू असतांना शेतात जाणे टाळावे.
शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील
पीकांच्या काढणी व रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी/ लागवड करण्याच्या दृष्टीने
आवश्यक असणा-या काढणी, मळणी तसेच पेरणी यांसारख्या यंत्राची दुरुस्तीची कामे
लवकरात लवकर करुन घ्यावीत.

Comments
Post a Comment