छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २४ ते २८ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून ब-याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६७ ते ९५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी
वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह
जोरदार तर दि. २४ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची
शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २८ सप्टेंबर
ते ०४ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तसेच
कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
शेंग वाढीची ते परिपक्वता अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा
अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी सोयाबीन पीकांमधील साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
बाजरी
दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा
अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी बाजरी पीकांमधील साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
आद्रक
कंद धरणे ते कंदवाढीची अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा
अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आद्रक पीकांमधील साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
हळद
कंद धरणे ते कंदवाढीची अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा
अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी हळद पीकांमधील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा
व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
मोसंबी
परिपक्वता ते काढणी अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा
अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी मोसंबी फळबागेमधील साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
डाळिंब
परिपक्वता ते काढणी अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा
अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी डाळींब फळबागेमधील साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
भाजीपाला
फळ धारणा ते फळवाढीची अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा
अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी भाजीपाला पीकांमधील साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पावसामुळे खाली पडलेल्या
टोमॅटो, वांगी व इतर भाजीपाला पीकांना दोरी व काठीच्या सहाय्याने आधार द्यावा.
तुती रेशीम
रेशीम किटकांच्या वाढीच्या
अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय देण्यापुर्वी रॅकवर
१०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व कात पास
होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.
पशुसंवर्धन
शेतकरी बांधवांनी
जनावरांना पाऊस चालू असतांना बाहेर चरावयास नेणे टाळावे तसेच पाणी पाजविण्यास
जनावरांना नदी, तलाव तसेच सार्वजनिक पानवठयाजवळ न जाता गोठयाजवळच शुध्द व ताज्या
पाण्याची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे पशुधनास पाऊस काळात सुरक्षित ठिकाणी बांधावे.
सद्यस्थितीत गोवंशीय
पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये
रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व
पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या सातव्या दिवशी
जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे, जनावरांमध्ये आजारी व
निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची स्वतंत्र व्यवस्था
करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे
आहे.
इतर
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह
जोरदार तर दि. २४ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची
शक्यता असुन शेतकरी बांधवानी पीकांमधील व फळबागेतील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व
पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच पाऊस चालू असतांना शेतात जाणे
टाळावे व पशुधनाची काळजी घ्यावी.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment