छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०५ ते ०९ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६३ ते ८९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. ०४ व ०५ सप्टेंबर
२०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन
वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०९ ते १५ सप्टेंबर २०२५
दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीऐवढे तर कमाल तापमान सरासरीपेक्षा
कमी व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
ऊस पीकामध्ये तण व्यवस्थापनाची कामे करुन
घ्यावीत.
कापूस
पाते लागणे ते बोंड धरणे
कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष ठेवावे. त्यासाठी
प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस पिकातील डोमकळया दिसल्यास वेचून नष्ट
कराव्यात. तसेच मागील आठवडयातील ढगाळ
वातावरणामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी माशी)
प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी असीटामिप्रीड २० टक्के ३० ग्रॅम
किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के ४० ग्रॅम किंवा फलोनिकॅनीड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर
पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मका
दाणे भरणे ते कणसे वाढीची
अवस्था
सध्यस्थितीत मका पिकाची वाढ झालेली असल्यामुळे
मका पीकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करण्याऐवजी जैविक
पध्दतीने किडव्यवस्थापन करण्याकरीता मेटारायझियम ऍनिसोपली ५० ग्रॅम किंवा
नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी.
तूर
फांद्या लागणे अवस्था
मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व वाढलेली
आर्द्रता यामुळे तुर पीकामध्ये पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादूर्भाव प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५
टक्के एसजी किंवा थायामेथोक्साम २५ टक्के डब्ल्युजी ४ - ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची
उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच तुर
पिकाचे शेंडे खुडावे जेणेकरून जास्त फांद्या फुटण्यास मदत होईल.
सिताफळ
फळवाढीची अवस्था
काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करुन
घ्यावीत. काढणीनंतर सिताफळ प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
भाजीपाला पीकाच्या चांगल्या वाढीसाठी १९:१९:१९ विद्राव्य
खताची २.५ किलो प्रतिएकर याप्रमाणात आळवणी करावी.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत गोवंशीय
पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये
रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व
पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या
सातव्या दिवशी जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे,
जनावरांमध्ये आजारी व निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची
स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त
काळजी घेणे गरजेचे आहे.
इतर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. ०४ व ०५ सप्टेंबर
२०२५ रोजी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची
शक्यता असुन शेतकरी बांधवानी पीकांमधील व फळबागेतील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा
निचरा करावा व पीकात तसेच बागेमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व पाऊस
चालू असतांना शक्यतो शेतात जाणे टाळावे.

Comments
Post a Comment