छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १० ते १४ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून
तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या
पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान
२२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६६ ते ८८ टक्के राहील तर
वाऱ्याचा वेग ०६ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १४ ते
२० सप्टेंबर २०२५ दरम्यान हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल
तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
शेंगा धरणे ते दाणे भरणे अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादूर्भाव
दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फ्लूबेन्डामाईड ३९.३५ एस
सी ०३ मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी ०३ मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच चक्री भुंग्याचा
प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी
२० मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी ०३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
बाजरी
दाणे भरणे अवस्था
पक्षांपासुन ज्वारी
पिकाच्या कणसाचे संरक्षण करण्याकरिता ( उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित
यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.
खरिप भुईमुग
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या
भुईमुग पीकाची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. काढणीनंतर शेंगाना ऊन द्यावे व
सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी.
आद्रक
फुटवे ते कंद धरणे अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व
दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा प्रादुर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा
मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी. तसेच पावसामुळे आद्रक
पिकामध्ये उघडे पडलेले कंद हलकी भर देऊन मातीने झाकुन घ्यावेत. आद्रक पीकाच्या
कंदवाढीकरीता २.५ किलो १९:१९:१९ लगेच व ३ दिवसांनी २.५ किलो १३:४०:१३ याप्रमाणे ७
दिवसानंतर परत वरीलप्रमाणे विद्राव्य खतांची प्रतिएकर याप्रमाणात आळवणी करावी.
हळद
फुटवे ते कंद धरणे अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व
दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा प्रादुर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा
मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी. तसेच पावसामुळे आद्रक
पिकामध्ये उघडे पडलेले कंद हलकी भर देऊन मातीने झाकुन घ्यावेत. आद्रक पीकाच्या
कंदवाढीकरीता २.५ किलो १९:१९:१९ लगेच व ३ दिवसांनी २.५ किलो १३:४०:१३ याप्रमाणे ७
दिवसानंतर परत वरीलप्रमाणे विद्राव्य खतांची प्रतिएकर याप्रमाणात आळवणी करावी.
मोसंबी
फळ वाढीची ते काढणी अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व
ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये फायटोप्थोरा ब्राउन रॉट या
बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होवून फळगळ होत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
मोसंबी बागेत जमीनीवर पडलेली फळे उचलून ती नष्ट करावीत तसेच फोसेटील अल्यूमिनीयम किंवा
मेफेनोक्झाम एमझेड या बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी.
डाळिंब
काढणी अवस्था
मागील आठवड्यातील वादळीवारा
तसेच पावसामुळे डाळींब बागेतील जमीनीवर पडलेली खराब फळे, काडीकचरा वेचून नष्ट
करावीत तसेच पावसामुळे खराब झालेली डाळींब बागेतील झाडे सशक्त व सदृढ होण्याकरीता
२.५ किलो १९:१९:१९ लगेच व ३ दिवसांनी २.५ किलो १२:६१:०० याप्रमाणे ७ दिवसानंतर परत
वरीलप्रमाणे विद्राव्य खतांची प्रतिएकर याप्रमाणात आळवणी करावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील काही दिवसांमधील पाऊस
व वाढलेली आर्द्रता टोमॅटो व वांगी पिकावर लवकर करपा
रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सीस्ट्रॉबीन २३
टक्के एससी १० मीली किंवा कॅप्टन (५० टक्के डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लीटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तुती रेशीम
रेशीम कीटकांना खाद्य देत
असताना फांदया, तुती पाने पातळ एका थरात दयावे.जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय
दिवसातून तीन वेळा दयावे.रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी
करावी. यामळे बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.कीटक कातेवरून बाहेर पडते
वेळी अर्धा तास अगोदर विजेता निर्जंतुक पावडर बरोबर डायथेन एम-४५ बुरशीनाशक २०
ग्रॅम प्रति किल्लो मिसळून रॅकवर धुरळणी करावी. पाऊस चालू असेल तर फांदया खाऊ
घालण्या अगोदर अर्धा ते एक तास पानावरील पाणी निचरून जाऊ दयावे व नंतर अळयांना
खादय दयावे.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत गोवंशीय
पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये
रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व
पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या सातव्या दिवशी
जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे, जनावरांमध्ये आजारी व
निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची स्वतंत्र व्यवस्था
करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे
आहे.
इतर
शेतकरी बांधवांनी शेतामध्ये किड व किटकनाशके
फवारणीनंतर औषधांच्या रिकाम्या बादल्या, डब्बे, पाकीटे इत्यादीं तलाव, नद्या तसेच
सार्वजनिक पाणवठयामध्ये न धूता त्यांची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावावी. जेणेकरुन
या औषधांपासून जनावरांना होणारी विषबाधा रोखता येईल.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment