छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०४ ते ०८ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय
हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.०
अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष
आर्द्रता ५८ ते ७६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते १० किमी/तास राहण्याची
शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०८ ते १४ ऑक्टोंबर २०२५
दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान,कमाल तापमान व किमान
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
वाढीची ते कांडे धरणे अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व पावसामुळे ऊस पिकामध्ये लोकरी मावा
किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस
(२० टक्के इ.सी.) १० ते १५ मिली किंवा ॲसिफेट २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी
कापूस
बोंड लागणे/ बोंड वाढीची
अवस्था
मागील आठवड्यातील झालेल्या पावसामुळे कापुस पीकामध्ये बोंडसडीचा
प्रादूर्भाव दिसून येत असुन आंतरिक बोंड सडीच्या व्यवस्थापनासाठी कॉपर
ऑक्सिक्लोराइड ५० % २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तर बाह्य बोंडसडीच्या
व्यवस्थापनासाठी पायराक्लोस्ट्रोबिन २० टक्के प्रति १० ग्रॅम किंवा मेटिराम
५५ टक्के + पायराक्लोस्ट्रोबिन ५ टक्के (पूर्वमिश्रीत बुरशीनाशक) २० ग्रॅम
किंवा प्रोपिनेब ७० टक्के प्रति २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मका
परिपक्वता ते काढणी अवस्था
मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर
करावी. त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे
दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत. त्यानंतर कणसातील दाणे काढण्यासाठी मका
सोलणी यंत्राचा वापर करावा. सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात
ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे
साठवणुकीत किडीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.
तूर
फांद्या लागणे अवस्था
मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व पावसामुळे तुर पीकाच्या खोडावर काळे डाग व
खाचा पडुन झाड हळूहळू वाळायला लागते हा फायटोप्थोरा रोग असुन याच्या
व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील एम ४ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी
करावी. तसेच तूर पिकात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशके ५ लिटर
प्रति २०० लीटर पाणी घेवून प्रति एकर या प्रमाणात आळवणी करावी.
सिताफळ
फळवाढीची अवस्था
काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करुन
घ्यावीत. काढणीनंतर सिताफळ प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत.
भाजीपाला
फळधारणा ते फळवाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व पावसामुळे मिरची पिकामध्ये मर
रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड
५० टक्के ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून
आळवणी करावी.
तसेच सध्यस्थितीत फुलगोभीवर गडडा पोखरणारी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मॅलेथीऑन ५० ईसी १५
मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत शेळ्यांमध्ये जुलाब/हगवण लागल्याचे
दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे
खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर पाण्यामध्ये मिसळून
द्रावण तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे. तसेच जनावरांच्या खाद्यामध्ये ओल्या
चा-याबरोबर कोरडया चा-याचा समावेश करावा. शेळया व मेंढयांच्या
पिल्लांना पशुवैदयकांच्या सल्ल्याने जंतनाशके दयावीत.
इतर
शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील पीकांच्या काढणी व रब्बी हंगामातील पिकांच्या
पेरणी/ लागवड करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणा-या काढणी, मळणी तसेच पेरणी
यांसारख्या यंत्राची दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करुन घ्यावीत.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment