छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २१ ते २५ जानेवारी २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि
किमान तापमान १५.० ते १८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ७२
टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २५ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान
हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहून पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व
किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
पिकाचे नाव आद्रक
परिपक्वता ते काढणी
आद्रक पिकाची काढणी
करत असताना ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा.
त्यासाठी पेट्रोलचलित "ब्रश कटर'चा वापर करावा. अन्यथा
तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी.
गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता
येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. काढणी केल्यानंतर त्यास चिकटलेली माती
स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी साठवणूक करावी.
हळद
परिपक्वता ते
काढणी
काढणीस तयार असलेल्या हळद पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद
करावे.
हरभरा
फुलधारणा/घाटे धरणे
हरभरा पीकामध्ये घाटेअळीच्या
सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत व
पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा एक ते दिड फूट उंचीचे T अक्षराच्या आकाराचे ५० पक्षी थांबे प्रति
हेक्टरी लावावेत. तसेच व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम किंवा
क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिलि
प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची
असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५
दिवसांच्या अंतराने करावी.
जवस
बोंड धरणे अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे जवस पीकावरील गादमाशी
अथवा पिलीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी निरिक्षण करावे. प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बटाटा
कंद लागणे ते कंद वाढीची अवस्था
बटाटा पिकातील
तणनियंत्रण करुन वरंब्यास मातीची भर दयावी तसेच पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन
करावे. तसेच मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे बटाटा पिकावर रस शोषण करणार्या
किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० टक्के)
१५ मिली किंवा अॅसिटामीप्रीड २-३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. तसेच पिवळ्या व निळया रंगाचे चिकट सापळे (छोट्या आकाराची) प्रत्येक ४-५
ओळींनंतर एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.
मोसंबी
फुलधारणा
अवस्था
मोसंबी बागेला पाणी
व्यवस्थापन करताना झाडाच्या खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मागील आठवड्यातील ढगाळ हवामान
मोसंबी बागेमध्ये कोवळ्या पानावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या
व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के ईसी २० मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एसएल २० मिली प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
डाळिंब
बहार व्यवस्थापन
डाळिंब बागेस योग्य
ताण बसल्यास ताण तोडताना शिफारशीत ३०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५०
ग्रॅम पालाश प्रती झाड खत मात्रा देऊन बागेस हलके पाणी दयावे.
भाजीपाला
फळ धारणा ते
फळवाढीची अवस्था
भाजीपाला पिकामध्ये
तणनियंत्रणाची कामे करून पिकास पाणी द्यावे व काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. मागील आठवड्यामध्ये किमान तापमानात झालेल्या घटीमुळे भाजीपाला पिकामध्ये
रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
पिकात निळ्या व पिवळ्या रंगाची चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात
लावावेत.तसेच निंबोळी अर्काची फवारणी करावी.
तुती रेशीम
तुती
पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपुल (गोदरेज) २०
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून छाटणीनंतर १२ ते १५ दिवसांनी तुती बागेवर
फवारणी करावी त्यामूळे पानांचे २० टक्के
उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल
तर सोबत बाव्हीस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
शेळया
व मेंढयांमध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत देवी या साथीच्या आजाराचा
प्रादूर्भाव मोठया प्रमाणात दिसून येतो. सदर आजार हा पॉक्स विषाणूपासून होणारा
संसर्गजन्य साथीचा आजार असुन त्यासाठी शेतक-यांनी तीन महिने वयाच्या वरील सर्व
शेळया-मेंढयांना जानेवारी महिण्यामध्ये न चूकता पशुवैदयकांच्या सल्ल्याने लसीकरण
करावे.
इतर
शेतक-यांनी
कापुस व तुर पिकांच्या काढणीनंतर रान तयार करुन पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी
भाजीपाला पिकांची लागवड करावी.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment