छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २४ ते २८ जानेवारी २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व
आकाश स्वच्छ
ते अंशत:ढगाळ राहील. तसेच
कमाल तापमान २७.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १६.० अंश
सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ६७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४
ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २८ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी
२०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा
कमी तर किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
मागील आठवड्यातील
तापमानातील चढउतारामुळे पूर्वहंगामी ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत
असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी १५ मीली किंवा
क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एससी ०४ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
तूर
परिपक्वता ते काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या तूर
पीकाची कापणी करुन घ्यावी व कापणी केलेले बंडल वाळविण्याकरीता शेतातच तूर पीकाच्या
झाडांच्या बुडांवर ठेवावे. योग्य वाळवणी झाल्यानंतर मळणी किंवा संयुक्त पीक काढणी
यंत्राव्दारे मळणी करुन धान्य वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
रब्बी ज्वारी
कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्था
पक्ष्यांपासून ज्वारी
पिकाच्या कणसांचे संरक्षण करण्यासाठी (उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी
स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.
मका (रब्बी)
कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्था
मका पिकावरील लष्करी
अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत. तसेच
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम
५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास थायमिथॉक्झाम १२.६ टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी प्रति ५
मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
करडई
बोंडया धरणे
मागील आठवडयातील तापमानातील चढउतारामुळे करडई पीकामध्ये रस शोषण करणा-या (काळा मावा) किडीचा
प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० ईसी १०
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच करडई
पिकावर अल्टरनेरीया (करपा) या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब (७५ डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
गहू
फुटवे ते ओंबी धरणे अवस्था
मागील आठवड्यातील
तापमानातील चढउतारामुळे गहू पिकामध्ये पोंगे मर (खोड किड) दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के २० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० मिली प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच तांबेरा रोगाचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झायनेब किंवा मॅन्कोझेब ७५
डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
गहू पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
कांदा
कंद वाढीची अवस्था
कांदा पीकास पुर्नलागवड
करुन ६० दिवस झाल्यास १३:००:४५ किंवा ००:००:५०
विद्राव्य खत १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मागील आठवड्यातील
तापमानातील चढउतारामुळे कांदा पिकावरील
फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १० मिली किंवा
फिप्रोनील ५ टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबा
मोहोर ते फळधारणा अवस्था
आंबा मोहोर फुलात असताना ते फळधारणा होईपर्यत
कीटकनाशकांची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेचे असल्यास बागेमध्ये
परागीभवन करणाऱ्या कीटकांवर होणार परिणाम टाळण्याकरिता फवारणी शक्यतो सकाळी किंवा
सायंकाळी करावी. तसेच आंबा बागेमध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील आठवडयातील तापमानातील चढउतारामुळे मिरची पिकावरील भुरी
रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम ५० टक्के डब्लूपी १० ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच वांगी पिकामध्ये
पर्णगुच्छ किंवा बोकड्या रोगाच्या प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी, रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी
डायमिथोएट किंवा इमिडाक्लोप्रिड २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५
दिवसाच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात. तसेच
भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
पशुसंवर्धन
शेतक-यांनी जनावरांमध्ये
व पक्ष्यांमध्ये लसीकरणाचा अतिरिक्त ताण पडू नये म्हणून लसीकरण साधारणत: सकाळी
किंवा संध्याकाळी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करावे.
इतर
सध्यस्तिथीत
शेतकरी बांधवांनी पिके, भाजीपाला पिके व फळबागेस सायंकाळच्या वेळेस पाणी द्यावे.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment