छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०५ ते ०९ सप्टेंबर २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६० ते ८५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते १५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०९ ते १५ सप्टेंबर २०२६ दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला पिकांचेनाव ऊस वाढीची अवस्था ऊस पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम अ निसोप्ली या उपयुक्त बुरशीचा ०४ किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. तसेच फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रीड ४० टक्के ०४ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. कापूस पाते लागणे ...