छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०४ ते ०८ जुलै २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६७ ते ९५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते २० किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. ०४ ते ०६ जुलै २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०९ ते १५ जुलै २०२६ दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान , कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला पिकांचेनाव ऊस बेणेप्रक्रिया व लागवड आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम कार्बेनडेझीम आण...