Posts

Showing posts from November, 2026

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०४ ते ०८ नोव्हेंबर२०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशतःढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३७ ते ६७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ५ ते ९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०८ ते १४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरी ऐवढे जास्त तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.  कृषी हवामान सल्ला पिकाचे नाव आद्रक कंदवाढीची अवस्‍था मागील आठवडयातील वाढलेली आर्द्रता यामुळे आद्रक पीकामध्ये पानावरील ठिपके, करपा आणि कंदसडीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी किंवा एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझ...