छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २० ते २४ मे २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ४१.० ते ४३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २४ ते ४८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २४ ते ३० मे २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

कांडे धरणे 

वाढते तापमान लक्षात घेता ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी व पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तसेच ऊस पिकात खोडकिडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८. % एस.सी. - मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी बाजरी

काढणी अवस्था

काढणीस तयार असलेल्या बाजरा पिकाची काढणी करून घ्यावी.

कापूस

जमिनीची निवड

कापूस पिकाची लागवड मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीत करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली ६० ते १०० सेमी असावी व सामू ०६ ते ८.५ असावा. कोरडवाहू कापूस लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १० ते १२ गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरवून घ्यावे.

मका

जमिनीची निवड

मका पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल उत्तम पाण्याचा निचरा करणारी जमीन हमखास असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ इतका असावा. मका पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १२ ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरवून घ्यावे.

तूर

जमिनीची निवड

तूर पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुसभुसीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. तूर पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरवून घ्यावे.

मूग/उडीद

जमिनीची निवड

मूग/उडीद पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, सुपीक व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. एकदम हलक्या प्रतीच्या मुरमाड जमिनीत पीक घेऊ नये.पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. मूग /उडीद पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरवून घ्यावे.

सिताफळ

जमिनीची निवड

नवीन सीताफळ रोपांची लागवड कमी पावसाच्या, मुरमाड, अंत्यत हलक्या, डोंगर उताराच्या जमिनी, मध्यम खोल जमिनीत करता येते.

आंबा

फळ वाढीची ते परिपक्वता अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची सकाळ व सायंकाळच्या वेळेस काढणी करुन घ्यावी. आंबा फळांची काढणी देठासहित करावी जेणेकरुन फळांचे काढणी पश्चात आयुष्य वाढून पक्वता एकावेळेस होण्यास मदत होते. 

जमिनीची निवड : सर्वसाधारणपणे पाण्याचा निचरा होणारी, १.५ ते २ मीटर खोलीची आणि त्याखाली मुरुम असलेली जमीन ह्या पिकासाठी निवडावी. लागवडीसाठी ५.५ ते ७.५ सामू असणारी जमीन अनुकूल आहे.

भाजीपाला

पूर्वमशागत व जमिनीची निवड

वाढते तापमान लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच खरीप हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे करून घ्यावीत. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकाच्या प्रकारानुसार जमिनीची निवड करावी.

चारा पिके

पूर्वमशागत

खरीप हंगामातील चारा पिकाच्या लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे करून घ्यावीत.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतक-यांनी पशुधनाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दिवसा जनावरे झाडांच्या सावलीत बांधावीत. तसेच जनावरांना पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच सायंकाळी जनावरे चरून आल्यावर त्यांना थंड पाण्याने अंघोळ घालावी जेणेकरून त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहील.तसेच तापमानात वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील तापमान ‍नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे.

इतर

सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना प्रखर सूर्य प्रकाश असताना दुपारच्या वेळेत काम करणे टाळावे.

जमिनीची मशागत समतल किंवा मुख्य उताराला आडवी करावी त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला