औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १४ ते १८ जुन २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ राहून दि. १४, १६ व १८ जून २०२३ रोजी तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३७.० ते ३८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २२ ते ६५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २३ ते २५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. १८ ते  जून २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

आंतरपीके

सोयाबीन पीकामध्ये सोयाबीन + तुर (२:१) किंवा (४:२), सोयाबीन + कापूस (१:१) किंवा (२:१) ही पीके आंतरपीक म्हणून घेतल्यास फायदेशीर ठरतात.

खरीप ज्वारी

आंतरपीके

खरीप ज्वारी पीकामध्ये, खरीप ज्वारी + सोयाबीन (२:४) किंवा (३:६) या प्रमाणात घेवून दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तुर (३:३) किंवा (४:२) याचप्रमाणे मुग, उडीद ही कमी कालावधीची पीके आांतरपीके (२:४) म्हणून घेतल्यास फायदेशीर ठरतात.

बाजरी

आंतरपीके

बाजरी पीकामध्ये, बाजरी + तुर (२:१), (३:३) किंवा (४:२) या प्रमाणात आंतरपीके घेतल्यास फायदेशीर ठरतात.

खरीप भुईमूग 

आंतरपीके

खरीप भूईमुग पीकामध्ये भुईमुग + सोयाबीन (४:१), भुईमुग + ज्वारी (१:१), भुईमुग + कापुस (१:१) ही आंतरपीके घेतल्यास फायदेशीर ठरतात.

आद्रक

लागवडपुर्व नियोजन

मध्यम व भारी जमिनीमध्ये आद्रक पीकाची लागवड सरी वरंबा पध्दतीने करावी. यासाठी लाकडी नांगराच्या सहाय्याने ४५ सें.मी. वरती स-या पाडुन घ्याव्यात. तसेच सरी पाडण्यापुर्वी शिफारशीत स्फुरद व पालाश जमिनीत मिसळावे. 

हळद

लागवडपुर्व नियोजन

हळद लागवडीकरीता ७५ ते ९० से.मी. अंतरावर सरी पाडून घ्याव्यात. सरी पाडण्यापुर्वी शिफारशीत स्फुदर व पालाश जमिनीत मिसळावे. तसेच जमीनीच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचा एक याप्रमाणे वाफे तयार करावेत.

मोसंबी

वाढीची अवस्था

मोसंबी फळबागेत ५००: ५००: ५०० ग्रॅम नत्र : स्‍फुरद : पालाश रासायनिक खतमात्रा + ४० किलो शेणखत प्रती झाड द्यावी.

डाळिंब

वाढीची अवस्था

डाळिंब फळबागेत ३००: २५०: २५०  ग्रॅम नत्र : स्‍फुरद : पालाश रासायनिक खतमात्रा + ४० किलो शेणखत प्रती झाड द्यावा.

भाजीपाला

रोप अवस्था

गादीवाफयावरील लागवड केलेल्या व ऊगवून आलेल्या रोपांना गरजेनुसार झारीच्या सहाय्याने पाणी दयावे.

सद्याच्या वातावरणामुळे मिरची पिकामध्ये रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा इत्यादी) किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम

लागवड पुर्व तयारी

उन्हाळ्यात शक्यतो पट्टा पद्धत तुती लागवडीत शेंद्रीय पदार्थाचे किंवा पॉलिथिन आच्छादनाचा वापर करावा. शेंद्रीय आच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष, झाडांची पाने, उसाची पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील मळी याचा वापर करावा. पट्टा पद्धत तुती लागवडीत एकास आड एक पट्यात २ x २.५ x १.५ फूट आकाराची चर करून त्यात वरील शेंद्रीय पदार्थ भरावेत.

पशुसंवर्धन

पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या असणारे बाह्य परजीवींचे (गोचीड, डास, गोमाशी इत्यादी) नियंत्रण करावे. तसेच जनावरांना लसीकरणापूर्वी जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा. 

इतर

सध्यस्थितीत काही ठिकाणी पडणारा पाऊस हा मान्सुनपुर्व पाऊस असुन मान्सूनचा पाऊस येण्यास अवकाश आहे, तरी शेतकरी बांधवानी पेरणीची घाई करू नये.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला