औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १७ ते २१ जुन २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३६.० ते ३८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २७ ते ६८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २६ ते २८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    

सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. १९ जुन २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दिनांक २१ ते २७ जुन २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरी पेक्षा जास्त तर किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

कांडे धरणे 

ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ऊस पिकामध्ये मूग, कांदा, पत्ता कोबी, फुलकोबी तसेच पानवर्गीय भाजीपाला पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास अधिक फायदा होतो.

कापूस

आंतर पिके

कापुस पीकामध्ये, कापूस + मूग (१: १ किंवा १ :२ ), कापूस + उडीद (१: १ ), कापूस + तूर (४ : १,६ :२, ८:२), कापुस + सोयाबीन (१:१), कापुस + भुईमुग (१:१) ही आंतरपीके फायदेशीर ठरतात.

मका

आंतर पिके

मका पिकामध्ये मका + सोयाबीन (६:३), मका + उडीद/मुग (४:२), मका + भुईमुग (४:२/६:३) तसेच भाजीपाला पीके आंतरपीके म्हणून घेतल्यास फायदेशीर ठरतात.

तूर

आंतर पिके

तुर पीकामध्ये तुर + बाजरी (१:२/२:४), तुर + सोयाबीन (१:४), तुर + मुग/उडीद (२:४), तुर + भुईमुग (१:३), तुर + ज्वारी (१:३), तुर + कापूस (१:) ही आंतरपीके फायदेशीर ठरतात.

मूग/उडीद

आंतर पिके

पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तूर, ज्वारी, मका व कापूस या पिकामध्ये मूग आणि उडीद पिके आंतरपीक म्हणून फायदेशीर ठरतात.

सिताफळ

आंतरपीक

सिताफळ फळपिकांमध्ये हिरवळीच्या पिकांची (ज्यूट, बरू आणि ढेंचा) या हिरवळीच्या पिकांची पेरणी केल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

आंबा

आंतरपीक

आंबा फळपिकांमध्ये हिरवळीच्या पिकांची (ज्यूट, बरू आणि ढेंचा) या हिरवळीच्या पिकांची पेरणी केल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

भाजीपाला

रोप अवस्था

गादी वाफयावरील लागवड केलेल्या व ऊगवून आलेल्या रोपांना गरजेनुसार झारीच्या सहाय्याने पाणी दयावे. तसेच सिंचनाची व्यवस्था उपलब्ध असल्यास रोपांची पुर्नलागवड करुन घ्यावी. 

चारा पिके

वाणांची निवड

शेतक-यांनी जनावरांना हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होण्यासाठी डीएचएन-६ व गुणवंत या वाणांची लागवड करावी.

पशुसंवर्धन

पावसाळा सुरु होण्यापूर्वी जनावरांच्या गोठ्याची दुरुस्ती करून घ्यावी तसेच पावसाळ्यातील प्राणघातक रोग जसे कि, घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत इत्यादी जीवघेण्या रोगापासून जनावरांच्या बचावासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.

इतर

शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य हंगामी पाऊस झाल्याशिवाय तसेच जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला