औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २१ ते २५ जुन २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ राहून दि. २४ व २५ जून २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३५.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४२ ते ७१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २३ ते २६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. २४ जुन २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन
वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. २५ जून ते ०१ जुलै २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते
ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल व किमान तापमान सरासरी ऐवढे
राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
आंतरपीके
सोयाबीन
पिकाची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. त्यामुळे शेतकरी बांधवानी आपल्या भागात
पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
सोयाबीन
पीकामध्ये सोयाबीन + तुर (२:१) किंवा (४:२), सोयाबीन + कापूस (१:१) किंवा (२:१) ही
पीके आंतरपीक म्हणून घेतल्यास फायदेशीर ठरतात.
खरीप
ज्वारी
आंतरपीके
खरीप
ज्वारी पिकाची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. त्यामुळे शेतकरी
बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
खरीप
ज्वारी पीकामध्ये, खरीप ज्वारी + सोयाबीन (२:४) किंवा (३:६) या प्रमाणात घेवून दोन
ओळीतील अंतर ४५ सेंमी ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तुर (३:३) किंवा (४:२) याचप्रमाणे
मुग, उडीद ही कमी कालावधीची पीके आांतरपीके (२:४) म्हणून
घेतल्यास फायदेशीर ठरतात.
बाजरी
आंतरपीके
बाजरी
पिकाची पेरणी २० जुलैपर्यंत करता येते. त्यामुळे
शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
बाजरी पीकामध्ये,
बाजरी + तुर (२:१), (३:३) किंवा (४:२) या प्रमाणात आंतरपीके
घेतल्यास फायदेशीर ठरतात.
खरीप
भुईमूग
आंतरपीके
भुईमुग
पिकाची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. त्यामुळे
शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
खरीप
भूईमुग पीकामध्ये भुईमुग + सोयाबीन (४:१), भुईमुग + ज्वारी (१:१), भुईमुग + कापुस
(१:१) ही आंतरपीके घेतल्यास फायदेशीर ठरतात.
आद्रक
लागवड
पाण्याची
उपलब्धतेनुसार आद्रक पिकाची लागवड करून घ्यावी. तसेच लागवड केलेल्या अद्रक
पिकामध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.
हळद
लागवड
पाण्याची
उपलब्धतेनुसार हळद पिकाची लागवड करून घ्यावी.तसेच लागवड केलेल्या हळद पिकामध्ये
सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.
मोसंबी
वाढीची अवस्था
नवीन मोसंबी
लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावीत. रोपे
खरेदी करत असतांना शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच खरेदी करावी. मोसंबी बागेमध्ये
सकाळ व सायंकाळच्या वेळेस ठिंबक सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.
डाळिंब
वाढीची अवस्था
नवीन डाळींब
लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावीत. रोपे
खरेदी करत असतांना शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच खरेदी करावी. डाळींब बागेमध्ये
सकाळ व सायंकाळच्या वेळेस ठिंबक सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
वाढीची अवस्था
भाजीपाला
पिकास पाणी व्यवस्थापन सकाळी व संध्याकाळी करावे.
तुती रेशीम
रोप
तयार करणे
रेशीम किटक
संगोपन करणा-या बहूतांशी शेतक-यांना रासायनिक खतांचे दुष्परिणाम जाणवत नाहीत.
निव्वळ रासायनिक खताच्या जोरावर रेशीम कोष उत्पादन शक्य होत नाही. किटकनाशके,
बुरशीनाशके किंवा तणनाशके जमिनीच्या आरोग्याला अपायकारक तर आहेतच पण त्याचबरोबर
जमिनीत रासायनिक किटकनाशके, खते, बुरशीनाशके व तण नाशकांची जास्त मात्रा हानिकारक
ठरते. त्याचे अंश जमिनीत राहतात व तुती पानात येऊन रेशीम किटकांच्या पोटात जातात
आणि अळयांना विषबाधा होते. अळया मृत पावतात.बहूतांशी शेतक-यांना हि बाब लक्षात न
आल्यामुळे रेशीम उद्योग सुरु केल्यानंतर २ ते ३ वर्षानंतर सोडून देतात. त्यामुळे
शिफारस केलेली शेणखत मात्रा २० टन प्रति हेक्टर/वर्ष म्हणजे ८ टन प्रति एकर दोन
हप्त्यात विभागून जून व नोव्हेंबर महिण्यात ४-४ टन याप्रमाणे द्यावी. तरच शाश्वत
कोष उत्पादन शेतक-यांना शक्य होईल.
पशुसंवर्धन
पशुपालकांनी
आपल्या जनावरांच्या असणारे बाह्य परजीवींचे (गोचीड, डास, गोमाशी इत्यादी) नियंत्रण
करावे. तसेच जनावरांना लसीकरणापूर्वी जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा. आजारी
जनावरांना लसीकरण करू नये. तसेच गाभण असलेल्या जनावरांना गाभण काळाच्या
शेवटी लसीकरण करू नये.
Comments
Post a Comment