औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १५ ते १९ ऑगष्ट २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६७ ते ८२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद
जिल्हयात दि. १६ ते २२ ऑगष्ट २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून
पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान
सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
वाढीची
ते कळी अवस्था
ढगाळ
वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी शेतात T आकाराचे पक्षीथांबे
उभारावेत तसेच इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५ मिलि किंवा प्रोफेनोफॉस
५० ईसी २० मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड २० टक्के डब्ल्युजी ५-६ ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच
सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचा
प्रादुर्भाव दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅमडा
सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी. तसेच पिकास गरजेनुसार
तुषार सिंचनाच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करावे.
खरीप
ज्वारी
वाढीची
अवस्था
ढगाळ व दमट
वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन, प्रादुर्भाव
ओळखण्यासाठी पिकात १५ कामगंध सापळे प्रति एकर याप्रमाणे लावावेत.
बाजरी
वाढीची
अवस्था
बाजरी पिकामध्ये कोळपणी व
तणनियंत्रणाची कामे करून घ्यावीत
खरीप
भुईमूग
कळी
ते फुल धारणा अवस्था
ढगाळ
वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुईमुग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव
दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी हेक्साकोनाझोल ५ टक्के ईसी ३० मिली प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पिकास गरजेनुसार
तुषार सिंचनाच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करावे.
आद्रक
फुटवे अवस्था
आद्रक
पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन रोपे पिवळी पडत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित
केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन
पाण्यात मिसळुन आळवणी करावी. तसेच पिकास गरजेनुसार
सिंचन करावे.
हळद
फुटवे अवस्था
सध्यस्थितीत
हळद पीक पिवळे पडत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ०.५ ते १ टक्के फेरस सल्फेट किंवा
एडिटिए चीलेटेड मिक्स मायक्रोनुट्रीएंट ग्रेड (II) ५० ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पिकास गरजेनुसार
सिंचन करावे.
मोसंबी
फळ वाढीची अवस्था
पाऊस व
ढगाळ वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ
दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेनडेझीम किंवा बावीस्टीन १५-२० ग्रॅम + युरिया
१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी
करावी. तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड (GA) २ ग्रॅम
+ पोटॅशियम नायट्रेट १.५ किलो + बोरिक ऍसिड ३०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात
मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच बागेत
गरजेनुसार सिंचन करावे.
डाळिंब
फळ वाढ ते काढणी अवस्था
काढणीस
तयार असलेल्या फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
भाजीपाला
पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे
प्रत्येकी २५ प्रति एकर याप्रमाणे लावावेत. तसेच मागील आठवड्यातील
ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे भेंडी पिकामध्ये भुरी रोगाच्या प्रादुर्भाव दिसुन येत
असुन याच्या व्यवस्थापनासाठी पाण्यात विरघळणारे सल्फर २५ ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच
भाजीपाला पिकास गरजेनुसार सिंचन करावे.
तुती
रेशीम
रेशीम
किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय
देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व
कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.
पशुसंवर्धन
पावसाळ्यामध्ये अस्वच्छता व वातावरणातील आर्द्रता अधिक असल्याने या
वातावरणात विविध जिवाणू व विषाणूंची वाढ झपाट्याने होऊन जनावरे जिवाणुजन्य व
विषाणुजन्य रोगास बळी पडतात हे टाळण्यासाठी जनावरांच्या गोठयात व गोठ्याच्या
बाहेरील भागात निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
इतर
फवारणी करताना नेहमी अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, गनबूट, इत्यादीचा वापर करावा व संपूर्ण शरीर झाकले
जाईल याची काळजी घ्यावी.
Comments
Post a Comment