औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०९ ते १३ ऑगष्ट २०२३ साठी हवामान अंदाज व कृषी हवामानसल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ८२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २१ ते २३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद
जिल्हयात दि. १३ ते १९ ऑगष्ट २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून
पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची
शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
वाढीची
अवस्था
ढगाळ
वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी शेतात T आकाराचे पक्षीथांबे
उभारावेत तसेच इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५ मिलि किंवा
प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड २० टक्के डब्ल्युजी ५-६ ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
खरीप
ज्वारी
वाढीची
अवस्था
ढगाळ व दमट
वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन, प्रादुर्भाव
ओळखण्यासाठी पिकात १५ कामगंध सापळे प्रति एकर याप्रमाणे लावावेत.
बाजरी
वाढीची
अवस्था
बाजरी पिकामध्ये कोळपणी व
तणनियंत्रणाची कामे करून घ्यावीत. तसेच बाजरी पीकास
पेरणीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता हलक्या जमिनीत २० किलो तर
भारी जमिनीत ३० किलो प्रति हेक्टरी युरियाव्दारे दयावा.
खरीप
भुईमूग
वाढीची
अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ हवामान व रिमझिम पाऊस असल्यामुळे भुईमूग पिकामध्ये फुलकिडीचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
आद्रक
वाढीची अवस्था
आद्रक
पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन रोपे पिवळी पडत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित
केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन
पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
हळद
वाढीची अवस्था
सध्यस्थितीत
हळद पीक पिवळे पडत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ०.५ ते १ टक्के फेरस सल्फेट किंवा
एडिटिए चीलेटेड मिक्स मायक्रोनुट्रीएंट ग्रेड (II) ५० ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मोसंबी
फळ वाढीची अवस्था
पाऊस व
ढगाळ वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ
दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेनडेझीम किंवा बावीस्टीन १५-२० ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी
करावी. तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड (GA) २ ग्रॅम
+ पोटॅशियम नायट्रेट १.५ किलो + बोरिक ऍसिड ३०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात
मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
डाळिंब
फळ वाढ ते काढणी अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ हवामान तसेच वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे डाळिंब बागेत
तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर
ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन किंवा ब्रॉनोपॉल ०५ ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच काढणीस तयार
असलेल्या फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे भेंडी पिकामध्ये भुरी रोगाच्या
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी पाण्यात विरघळणारे सल्फर २५
ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच भाजीपाला
पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे प्रत्येकी
२५ प्रति एकर याप्रमाणे लावावेत.
तुती
रेशीम
सध्यस्थितीत रेशीम शेतकऱ्यांनी, तुती पाने खादय पातळ एका थरात दयावे. जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय
दिवसातून तीन वेळा दयावे. रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी
करावी. यामळे बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.कीटक कातेवरून बाहेर पडते
वेळी अर्धा तास अगोदर विजेता निर्जंतुक पावडर बरोबर डायथेन एम-४५ बुरशीनाशक २०
ग्रॅम प्रति किल्लो मिसळून रॅकवर धुरळणी करावी. पाऊस चालू असेल तर फांदया खाऊ
घालण्या अगोदर अर्धा ते एक तास पानावरील पाणी निचरून जाऊ दयावे व नंतर अळयांना
खादय दयावे.
पशुसंवर्धन
पावसाळ्यामध्ये अस्वच्छता व वातावरणातील आर्द्रता अधिक असल्याने या
वातावरणात विविध जिवाणू व विषाणूंची वाढ झपाट्याने होऊन जनावरे जिवाणुजन्य व
विषाणुजन्य रोगास बळी पडतात हे टाळण्यासाठी जनावरांच्या गोठयात व गोठ्याच्या बाहेरील
भागात निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
इतर
फवारणी करताना नेहमी अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, गनबूट, इत्यादीचा वापर करावा व संपूर्ण शरीर झाकले
जाईल याची काळजी घ्यावी.
Comments
Post a Comment