औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०२ ते ०६ सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४७ ते ८६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १३ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद
जिल्हयात दिनांक ०६ ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील.
तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे
राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
ऊस पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील ४० टक्के +
इमिडाक्लोप्रिड ४० टक्के डब्ल्युजी १५० ग्रॅम आणि डेल्टामेथ्रीन १०० इसी ११ टक्के
२५० मिली प्रति एकर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
कापुस
पाते लागणे ते बोंड धरणे
मागील काही
दिवसापासुन पावसाच्या खंडामुळे सद्यस्थितीत जिल्हयात ब-याच ठिकाणी कापुस पीकास पाण्याचा ताण बसत असुन, त्याकरीता पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी, जेणेकरून पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढेल.
तसेच पाण्याच्या ताणामुळे पाने सुकत असल्यास उपलब्धतेनूसार संरक्षित सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या
प्रादूर्भावावर लक्ष ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
कापुस पिकातील डोमकळया दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात.
मका
कणसे धरणे
मागील काही
दिवसापासुन पावसाच्या खंडामुळे सद्यस्थितीत जिल्हयात ब-याच ठिकाणी मका पीकास
पाण्याचा ताण बसत असून, पिकास
उपलब्धतेनुसार संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तसेच मका पिकावरील
लष्करी अळीचा प्रादुर्भाव ओळखन्यासाठी एकरी २० कामगंध सापळे लावावेत. तसेच मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ५ टक्के निंबोळी
अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तुर
फांद्या लागणे अवस्था
मागील काही दिवसापासुन पावसाच्या खंडामुळे सद्यस्थितीत जिल्हयात ब-याच
ठिकाणी तुर पीकास पाण्याचा ताण बसत असुन, त्याकरीता पोटॅशियम
नायट्रेट (१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी
जेणेकरून पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढेल. तसेच पिकात हलकी कोळपणी करावी
जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकुन राहील.
मुग/उडीद
शेंगा लागणे ते दाणे भरणे
मागील काही दिवसापासुन पावसाच्या खंडामुळे मुग पीकास पाण्याचा ताण बसत
असून, पिकास उपलब्धतेनुसार संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तसेच पाण्याची
उपलब्धता नसल्यास, पिकास पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळुन
फवारणी करावी जेणेकरून पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढेल.
सिताफळ
फळवाढीची अवस्था
सीताफळ बागेत गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास व्हर्टिसिलियम लिकॅनी ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
भाजीपाला पिकामध्ये तण नियंत्रणाची कामे करून घ्यावीत. तसेच पिकास
गरजेनुसार संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तसेच मागील आठवड्यातील
दमट वातावरणामुळे मिरची
पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे,मावा) किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५
टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
गोवंशीय
पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये
रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व
पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या
सातव्या दिवशी जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे,
जनावरांमध्ये आजारी व निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची
स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त
काळजी घेणे गरजेचे आहे.
इतर
बऱ्याच दिवसापासुन जिल्ह्यामध्ये पावसाने खंड दिल्यामुळे पिकांना पाण्याचा
ताण बसत असुन पिके सुकत असून पिकांना उपलब्धतेनूसार संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी
द्यावे. पाण्याची उपलब्धता नसल्यास, पोटॅशियम
नायट्रेट (१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,
जेणेकरून पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढेल. तसेच पिकात हलकी कोळपणी करावी
जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकुन राहील.
Comments
Post a Comment