छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०४ ते ०८ ऑक्टोबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४४ ते ८६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०८
ते १४ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून
पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची
शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
शेंगा
वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील दमट व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर शेंगा करपा दिसून येत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी टेबूकोनॅझॉल २५.९ टक्के ईसी किंवा टेबूकोनॅझॉल १० टक्के +
सल्फर ६५ टक्के डब्लूजी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी
करावी.
खरीप ज्वारी
काढणी अवस्था
खरीप
ज्वारी पीकाची काढणी करुन मळणी करुन घ्यावी तसेच मळणीनंतर धांन्यास
ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी झाल्यास रब्बी पीकांसाठी
पेरणीपुर्व तयारी करुन घ्यावी.
बाजरी
काढणी अवस्था
बाजरी
पीकाची काढणी करुन मळणी करुन घ्यावी तसेच मळणीनंतर धांन्यास
ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी झाल्यास रब्बी पीकांसाठी
पेरणीपुर्व तयारी करुन घ्यावी.
आद्रक
कंद वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील दमट व ढगाळ वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स
हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन
आळवणी करावी किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १० ग्रॅम व
स्ट्रॅप्टोसायकलीन १-२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची उघाड बघुन आळवणी
करावी.
हळद
कंद वाढीची अवस्था
मागील काही
दिवसांमधील दमट व ढगाळ वातावरणामुळे हळद पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसुन येत
असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे
जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी
करावी.
हरभरा
जमिनीची निवड
हरभरा
पिकाच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम
निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी
साठवून ठेवणा-या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते.
जवस
जमिनीची निवड
जवस
पीकाच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी जमीनीची निवड करावी.
बटाटा
जमीनीची निवड
बटाटा
लागवडीकरिता मध्यम प्रतीची,मिश्रित पोयट्याची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन
जास्त चांगली असते. भारी,चिकण वा पाणथळ जमिनीची निवड करू नये.कारण या जमिनीची पाणी
धारण करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून लागवड केलेला बटाटा किंवा बटाट्याच्या
फोडी (बियाणे) लागवडीनंतर ताबडतोब कुजणे किंवा सडण्याची शक्यता असते. त्यामुळे
बटाट्याची उगवण अतिशय कमी होते.
मोसंबी
फळ वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
कार्बेनडेझीम किंवा बावीस्टीन १५-२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी
करावी.
डाळिंब
फळ वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे डाळिंब बागेत रस शोषण करणाऱ्या किडींचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६
टक्के ओडी ७.५ मिली किंवा फ्लॉनिकॅमिड ५० टक्के डब्ल्यूजी ७.५ ते १० मिली प्रति १०
लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव
दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एससी ४
मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
तुती रेशीम
रेशीम
किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय
देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व
कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत
गोवंशीय पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील
वासरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या
नियंत्रणासाठी व पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या
सातव्या दिवशी जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे, जनावरांमध्ये
आजारी व निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची स्वतंत्र
व्यवस्था करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त काळजी घेणे
गरजेचे आहे.
इतर
परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स जैविक बुरशीनाशक व
कीडनाशक तसेच जैविक संघ (NPK) कृषी
विज्ञान केंद्र पैठण रोड औरंगाबाद येथे विक्रीस उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment