छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०७ ते ११ ऑक्टोबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४५ ते ६९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ११ ते १७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे ऊस पिकामध्ये लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ % एस.एल. १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

कापुस

पाते लागणे ते बोंड धरणे

मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे कापुस पिकामध्ये पातेगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलिक सिटीक सिड (एनएए) २ ते २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस पिकातील डोमकळया दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात.

मका

काढणी अवस्था

मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी. त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत. त्यानंतर कणसातील दाणे काढण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करावा. सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.

तुर

फांद्या लागणे अवस्था

तुर पीकावरील पाने गुंडाळणा-या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरिफॉस २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

रब्‍बी ज्‍वारी

वाणांची निवड

रब्‍बी ज्‍वारी पेरणीसाठी परभणी मोती, परभणी सुपर मोती, मालदांडी (एम- ३५-१), परभणी ज्योती, परभणी शक्ती, अकोला क्रांति, फुले यशोदा, फुले माऊली या वाणांपैकी एका वाणाची निवड करावी.

करडई

वाणांची निवड

करडई पेरणीसाठी परभणी कुसुम, परभणी- ८६, फुले कुसुम, शारदा, परभणी- ४० या वाणांपैकी एका वाणाची निवड करावी.

कांदा

रोपवाटीका तयार करणे

कांदयाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे १ मी रुंद, ३ मी लांब आणि १५ सेमी उंच तयार करावा. वाफयाच्या रुंदीशी समांतर अशा ५ सेमी बोटाने रेषा पाडाव्यात आणि यामध्ये बियाणे ओळीत पातळ पेरुन नंतर मातीने झाकुन टाकावे. कांदा लागवडीसाठी ग्रीफाउंड डार्क रेड, ग्रीफाउंड लाईट रेड, भिमा रेड, भिमा किरण (लाल कांदा) आणि भिमा स्वेत, भिमा सफेद (पांढरा कांदा) या वाणांचा वापर करावा. 

सिताफळ

फळवाढीची अवस्था

मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे सिताफळ फळबागेत पीठया ढेकुण किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापणासाठी क्‍लोरपायरीफॉस २० मिली  प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच बागेत झाडांच्या बुध्यां भोतवतालच्या तणांचे व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

सध्यस्थितीत फुलगोभीवर गडडा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मॅलेथीऑन ५० ईसी १५ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत शेळ्यांमध्ये जुलाब/हगवण लागल्याचे दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे.

इतर

परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स जैविक बुरशीनाशक व कीडनाशक तसेच जैविक संघ (NPK) कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड औरंगाबाद येथे विक्रीस उपलब्ध आहे.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला