छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०९ ते १३ डिसेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६२ ते ९१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते ०९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १३ ते १९ डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

फुटवे अवस्था ते कांडे धरणे

ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० ते २५  मिली किंवा फिप्रोनील ५ एससी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच लागवड करून सहा आठवडे झाले असल्यास ऊस ‍पिकामध्ये नत्र खताची दुसरी मात्रा १२० किलो प्रति हेक्टर प्रमाणात द्यावी.   

कापुस

बोंड धरणे ते वेचणी अवस्था

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीचा चांगला व कवडी कापूस वेगळा साठवावा. मागील आठवडयातील झालेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे कापुस पीकामध्ये बोंडसडीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कापुस पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ८८ ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के ४०० मिली प्रति एकर याप्रमाणात आलटून पालटून तीन दिवसानंतर फवारणी करावी. 

तुर

दाणे भरणे ते शेंगा वाढीची अवस्था

मागील आठवडयातील झालेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ६.६ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तूर पिकावरील शेंगमाशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी ०८ मिली किंवा ल्युफेनुरॉन ५.४ टक्के १२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रब्‍बी ज्‍वारी

वाढीची अवस्‍था

रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत.तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई

वाढीची अवस्‍था

मागील आठवडयातील झालेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे करडई पिकातील रस शोषण करणा-या (काळा मावा) किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टरी ५० या प्रमाणात लावावेत.

मका (रब्बी)

वाढीची अवस्‍था

मका पिकावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत.तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गहू   

पेरणी  ते वाढीची अवस्था

गहू पिकाची पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करता येते. पेरणी झाली नसल्यास लवकरात लवकर गहू पिकाची पेरणी बीजप्रक्रिया करूनच करावी. तसेच पेरणी करुन २० ते ३० दिवस झालेल्या फुटवे अवस्थेतील गहू पीकास नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो याप्रमाणे प्रतिहेक्टरी दयावा.

कांदा

वाढीची अवस्था

मागील आठवडयातील झालेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे कांदा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. तसेच कांदा पिकावरील मावा, तुडतुडे व फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.

पेरू

फळ वाढीची ते परीपक्वता अवस्था

मागील आठवडयातील झालेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे पेरू बागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी २० ते २५ मिथाईल युजेनॉलची रक्षक सापळे लावावीत. तसेच काढणीस तयार असलेल्या पेरु फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.

आंबा

फुलधारणा अवस्था

मागील ढगाळ वातावरणामुळे आंबा फळबागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रोपीओनेट १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

फळधारणा ते फळवाढीची अवस्था

मागील आठवडयातील झालेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे टोमॅटो व वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रानिलीप्रोल १८.५  एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोले १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत शेतकरी बांधवांनी थंडीपासुन जनावरांचे व पक्ष्यांचे संरक्षण करण्याकरीता जनावरांच्या व पक्ष्यांच्या शेडला बारदाने लावावेत. शेडमधील तापमान नियंत्रीत ठेवण्याकरीता इलेक्ट्रीक बल्ब लावावेत. तसेच जनावरांना रात्रीच्या वेळेस उघडयावर न बांधता गोठयातच बांधावे.

शेतकरी बांधवांनी शेळया व मेंढयांना सकाळी उशीरा चरण्यासाठी सोडावे व सर्दी जाणवल्यास पशुवैदयकांच्या सल्ल्याने उपचार करावा.

इतर

शेतकरी बांधवांनी गहू व ज्वारी पीकांची पेरणी राहीली असल्यास लवकरात लवकर करुन घ्यावी.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला