छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १३ ते १७ जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवमान कोरडे व स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३.० ते १६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३३ ते ६९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १० किमी/ता६ राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दिनांक १७ ते २३ जानेवारी २०२४ दरम्यान हवामान कोरडे व स्वच्छ
राहील. तसेच पर्जन्यमान सरासरी ऐवढे व कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा
कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
खोडवा व्यवस्थापन
खोडवा
व्यवस्थापन :
शेतक-यांनी ऊस पाचट न जाळता,पाचट एक आड एक सरीत जमा करावे. पाचट जमा करतांना पट्टा
पध्दतीत पाचटाचे आच्छादन करावे किंवा कुटी यंत्राच्या साह्याने पाचटाचे कुटी करावी
त्यानंतर पाचटावर पाचट कुजविणारे जिवाणू १० किलो + शेणखत + युरिया ८० किलो + सुपर
फॉस्फेट १०० किलो प्रति हेक्टर मिसळून टाकावे व बगला फोडाव्यात. तसेच बुडखे
जमीनीलगत छाटावे व छाटलेल्या बुडख्यावर क्लोरोपायरीफॉस २० मिली
+ कार्बेन्डाझिम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जेणेकरून
बुरशीजन्य रोगाचा तसेच किडींचा प्रादुर्भाव रोखल्या जाईल.
कापुस
वेचणी अवस्था
शेतकरी
बांधवानी फरदड घेणे टाळावे. कापूस पिकाची शेवटची वेचणी झाल्याबरोबर गुलाबी
बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उभी कपाशी कॉटन श्रेडरच्या साहाय्याने
मूलस्थानी कुटी करावी त्यानंतर युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट १०० किलो प्रति
हेक्टर समप्रमाणात मिसळून टाकावे व मशागत करून केलेली कुटी मातीआड करावी जेणेकरून
येणाऱ्या खरीप हंगामापर्यंत संपूर्ण कापूस कुटी कुजून जमिनीतील सेंद्रिय घटकामध्ये
वाढ होईल.
तुर
काढणी अवस्था
कापणी
केलेल्या तुर पीकाची योग्य वाळवणी झाल्यानंतर मळणी किंवा संयुक्त पीक काढणी
यंत्राव्दारे मळणी करुन धान्य वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच शेतक-यांनी तूर धान्यातील काडीकचरा वेगळा
करण्यासाठी व प्रतवारीकरीता स्पायरल सेपरेटरचा वापर करावा.
रब्बी
ज्वारी
पोटरी ते कणसे धरणे अवस्था
सध्याचे
वातावरण रस शोषण करणाऱ्या किडीसाठी पोषक असून त्यामुळे रब्बी ज्वारी पिकामध्ये
चिकट्याचा दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी निबोळी अर्क १०००० पीपीएम १०
मिली किंवा डायमिथोएट २० मिली प्रती १०
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करडई
बोंडया धरणे
मागील
आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे करडई पिकातील रस शोषण करणा-या (काळा
मावा) किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट
३० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मका
(रब्बी)
वाढीची ते कणसे
धरणे अवस्था
मागील
आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादूर्भाव
वाढण्याची शक्यता असुन याच्या सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत. तसेच
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम
५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गहू
फुटवे ते पोटरी
अवस्था
सध्याचे
वातावरण गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक आहे. यावर
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निबोळी अर्क (१०००० पीपीएम) १० मिली किंवा डायमिथोएट २०
मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
कांदा
कंद धरणे अवस्था
मागील
आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५ ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.
पेरू
काढणी अवस्था
काढणीस
तयार असलेल्या पेरु फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत विक्रीसाठी
पाठवावेत.
आंबा
फुलधारणा अवस्था
मागील
आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे आंबा फळबागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीओनेट १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. तसेच आंबा पिकावर तुडतूडयांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापणासाठी थायमिथॉक्झाम २५ टक्के डब्लूजी २ ग्रॅम किंवा डेल्टामेथ्रीन २.८
टक्के ईसी ०.५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. पहिली फवारणी फुलोरा येण्यापुर्वी झाडांच्या सालीवर,
फांदयावर करावी व नंतरच्या फवारण्या दो आवठयाच्या अंतराने कराव्यात.
भाजीपाला
फळधारणा ते फळवाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे टोमॅटो पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रानिलीप्रोल
१८.५ एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकामध्ये फुलगळ व
फळगळ होऊ शकते त्यामुळे पिकास मोकाट पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.
पशुसंवर्धन
हवामानातील अचानक बदलामुळे कोंबडयांवर ताण येतो.
त्यामुळे त्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व ब जीवनसत्वाचा वापर करावा जेणेकरुन
ताण कमी होण्यास मदत होईल.
इतर
शेतक-यांनी रब्बी
हंगामातील पीकांना त्यांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत गरजेनुसार पाणीव्यवस्थापन
करावे, जेणेकरुन ओलाव्यामुळे जमीनीतील अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होवून ताण
कमी राहिल्याने किडींचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व उत्पन्नात वाढ होते.
Comments
Post a Comment