छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १३ ते १७ जुलै २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७४ ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता:
छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. १५ जुलै २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या
कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. १६ जुलै २०२४ रोजी जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता
असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दिनांक १७ ते २३ जुलै २०२४ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ
राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व
किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
बेणेप्रक्रिया व लागवड
आडसाली ऊस
लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी करून घ्यावी. आडसाली
ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची
निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम कार्बेनडेझीम आणि डायमेथोएट ३००
मिली प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १०-१५ मिनिट द्रावणात बुडवावे. रासायनिक
प्रक्रिया झाल्यानंतर ऍसिटोबॅक्टर १० किलो + स्फुरद विरघळणारे जिवाणू २.५ किलो + १
किलो ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात द्रावण करून त्यामध्ये १५-२०
मिनिटे बेणे बुडवुन ठेवावे व त्यानंतर लागवड करावी.
कापूस
वाढीची अवस्था
मागील
आठवडयातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी
माशी) प्रादूर्भाव होण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी ८ ते १० पिवळे व
निळे चिकट सापळे प्रति एकर प्रमाणात लावावेत व ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी
करावी. तसेच कापुस पिकामध्ये लागवडीच्या वेळी खताची पहिली मात्रा दिली नसल्यास, ६०:६०:६० किलो
नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर आळे पद्धतीने किंवा पेरून द्यावा.
मका
वाढीची अवस्था
मका
पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता असल्यास तण
नियंत्रणासाठी पीक २५ ते ३० दिवसाचे झाले असल्यास हॅलोसल्फुरॉन मिथाइल ७५ टक्के
डब्ल्यूजी २.४ ग्रॅम किंवा टेम्बोट्रिओन
३४.४ टक्के एससी ५.७ मिली या तणनाशकांची
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. तसेच मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव
ओळखन्यासाठी एकरी २० कामगंध सापळे लावावेत.
तूर
वाढीची अवस्था
तुर
पिकामध्ये कोळपणी व तण नियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन करावीत.
मूग/उडीद
वाढीची अवस्था
मागील ढगाळ
वातावरणामुळे मुग/उडीद पिकावर पाने खाना-या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
स्वच्छ वातावरणात पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.तसेच पिकातील तण
व्यवस्थापन करावे.
सिताफळ
कळी अवस्था
सिताफळ
बागेत तण व्यवस्थापन करावे. तसेच पिठ्या ढेकूण किटकावर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी
बागेतील सर्व झाडाच्या जमिनीलगत बुडावर चिकट बँड किंवा प्लास्टिकच्या टेपचा वापर
करावा व प्लास्टिक टॅपवर चिकट वंगण (ग्रीस) पसरवावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे वांगी पिकावर शेंडा व फळ
पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के
निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन १० टक्के
ई.सी.०६ मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ई.सी. १० मिली किंवा इमामेक्टिन
बेन्झोएट ५ टक्के एस सी ०३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
पशुसंवर्धन
शेतकरी
बांधवानीं गोठयात होणा-या बाहय व आंतरपरजीवी जंतूचा जसे की, गोचीड, गोमाश्या, मच्छर, डास, चिलटे
यांच्या प्रादूर्भावापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठयामध्ये भरपूर हवा व
सुर्यप्रकाश येईल याची काळची घ्यावी. तसेच गोठयात पडलेले खड्डे मुरुम व रेतीने
भरुन घ्यावेत जेणेकरून गोठ्यात कोरडेपणा टिकून राहील.
इतर
पुढील पाच दिवसाच्या हवामान अंदाजानुसार पुढील
दोन दिवसानंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असुन शेतकरी बांधवांनी पुढील दोन
दिवसामध्ये शेतातील खुरपणी, कोळपणी,फवारणीचे कामे करून घ्यावीत.
Comments
Post a Comment