छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ११ ते १५ सप्टेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठीकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७० ते ८५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १० व ११ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी ‍वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १६ ते २२ सप्टेंबर २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरी ऐवढे, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

शेंगा लागणे ते दाणे भरणे अवस्था

मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकामध्ये शेंगा करपा दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी टेबूकोनॅझॉल १० टक्के + सल्फर ६५ टक्के डब्लूजी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच सोयाबीन पीक सद्यस्थितीत दाणे भरण्याच्या अवस्थेत असुन, ००:५२:३४ या विद्राव्य खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खरीप ज्वारी

कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्था

मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये मिजमाशीचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन मॅलाथिऑन किटकनाशकाची ५ टक्के भुकटी २० किलो याप्रमाणे प्रति हेक्टरी स्वच्छ वातावरणात धुरळणी करावी.

खरीप भुईमूग 

दाणे भरणे ते परिपक्वता

काढणीस तयार असलेल्या भुईमुग पीकाची काढणी करुन घ्यावी. काढणीनंतर शेंगाना ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी.

आद्रक

फुटवे ते कंद धरणे अवस्‍था

सध्यस्थितीत अद्रक पिकामध्ये सुत्रकूर्मीचा (मुळावरील गाठी) प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी पॅसिलोमायसीस या जैविक बुरशीची १ किलो/लिटर प्रति एकर  २०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. तसेच तसेच पावसामुळे अद्रक पिकामध्ये उघडे पडलेले कंद हलकी भर देऊन मातीने झाकुन घ्यावेत.

हळद

फुटवे ते कंद धरणे अवस्‍था

मागील काही दिवसांमधील दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पावसामुळे हळद पिकामध्ये उघडे पडलेले कंद हलकी भर देऊन मातीने झाकुन घ्यावेत.

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून गाळ झालेली फळे वेचुन नष्ट करावीत तसेच फळमाशीकरिता कामगंध सापळे (मिथाईल युजेनॉल) एकरी चार ते पाच प्रमाणात लावावेत व मॅलॅथिऑन ५० टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची उघड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. 

डाळिंब

फळ वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे डाळिंब बागेत रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६ टक्के ओडी ७.५ मिली किंवा फ्लॉनिकॅमिड ५० टक्के डब्ल्यूजी ७.५ ते १० मिली प्रति १० लिटरपाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे वांगी पिकामध्ये पर्णगुच्छ/बोकड्या रोगाच्या प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी, रोगट झाडे उपटुन नष्ट करावीत. तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायमिथोएट किंवा इमिडाक्लोप्रिड २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन १० ते १५ दिवसाच्या अंतराने २-३ फवारण्या स्वच्छ वातावरणात कराव्यात.तसेच मिरची पीकावरील विषाणूजन्य चूरडामुरडा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रादूर्भावग्रस्त झाडे नष्ट करावीत. तसेच पायरीप्रोक्सीफेन १० टक्के ईसी २० मिली किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

रेशीम किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.  

पशुसंवर्धन

जनावरांच्या गोठयात व गोठ्याच्या बाहेरील भागात निर्जंतुकीकरण करून घ्यावे. सध्यस्थितीत जनावरांमध्ये गोचीड, माश्या, डास, रक्त पिपासूं यासारख्या किडी दिसून येत आहेत याच्या निर्मूलनासाठी वनस्पतीजन्य किटकनाशके जसे १० मिली  निमतेल + १० मिली करंजतेल + २० ग्रॅम अंगाला लावण्याचा साबणाचा चुरा १ लिटर पाण्यात मिश्रण तयार करून २ तास भिजत ठेवून हे द्रावण जनावरांच्या शरीरावर तसेच गोठ्यात फवारून घ्यावे.

इतर

शेतकरी बांधवांनी शेतामध्ये किड व ‍किटकनाशके फवारणीनंतर औषधांच्या रिकाम्या बादल्या, डब्बे, पाकीटे इत्यादीं तलाव, नद्या तसेच सार्वजनिक पाणवठयामध्ये न धूता त्यांची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावावी. जेणेकरुन या औषधांपासून जनावरांना होणारी विषबाधा रोखता येईल.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला