Posts

Showing posts from November, 2024

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३० नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषीहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३८ ते ६६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर  कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० ते २५  मिली किंवा फिप्रोनील ५ एससी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तसेच लागवड करून सहा आठवडे झाले असल्यास ऊस ‍पिकामध्ये नत्र खताची दुसरी मात्रा १२० किलो प्रति हेक्टर प्रमाणात द्यावी.    कापूस बोंड धरणे ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८.० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १०.० ते १२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ६४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०१ ते ०७ डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्था आद्रक पिकामध्ये कंद वाढीसाठी ००:५२:३४ या विद्राव्य खताची मात्रा ५ किलो प्रति एकर दोन वेळा विभागुन ठिबक सिंचनाद्वारे द्यावी. हळद कंद वाढीची अवस्था हळद पिकामध्ये कंद वाढीसाठी ००:५२:३४ या विद्राव्य खताची मात्रा ५ किलो प्रति एकर दोन वेळा विभागुन ठिबक सिंचनाद्वारे द्यावी. हरभरा वाढीची अवस्था सद्यस्थितीत तापमानातील चढउतारामुळे हरभरा पीकामध्ये मर रोगाचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन याच्या व...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ६८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २७ नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.   कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था ऊस पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० ते २५  मिली किंवा फिप्रोनील ५ एससी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कापूस बोंड धरणे ते वेचणी कापुस पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणात गुलाबी बोंडअळीचे कामगंध साप...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २० ते २४ नोव्हेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १२.० ते १४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३८ ते ६१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २४ ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्था आद्रक पिकामध्ये तण नियंत्रण करून हलकी भर द्यावी व पिकास गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. तसेच अद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील ४ टक्के + मॅन्कोझेब  ६४ टक्के २५ ग्रॅम प्रति १० पाण्यात मिसळुन आळवणी करावी. हळद कंद वाढीची अवस्था हळद पिकामध्ये तण नियंत्रण करून हलकी भर द्यावी व पिकास गरजेनुसार सुक्...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १५ ते १९ नोव्हेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३७ ते ६३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था ऊस पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. कापूस बोंड धरणे ते वेचणी वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून घ्यावी. तसेच कापुस पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणात गुलाबी बोंडअळीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पीकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त प्रमाणास दिसून येत असल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायपरमे...