छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १५ ते १९ नोव्हेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३७ ते ६३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच
पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची
शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
ऊस पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
कापूस
बोंड धरणे ते
वेचणी
वेचणीस
तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून घ्यावी. तसेच कापुस पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५
याप्रमाणात गुलाबी बोंडअळीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पीकातील डोमकळ्या वेचून
नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त प्रमाणास दिसून येत असल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी
३० मिली किंवा प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के ईसी १० मिली किंवा
लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आलटून पालटून
फवारणी करावी.
तूर
फुलधारणा अवस्था
तुर पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन
करावे. तसेच तूर पिकांमधील फुलगळ रोखण्यासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड
(एनएए) ४.५ टक्के एस.एल.४.४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी.तसेच तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी)
६.६ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
रब्बी ज्वारी
रोप अवस्था
वेळेवर
पेरणी केलेल्या ज्वारी पिकामध्ये पहिली कोळपणी करून घ्यावी.
मका (रब्बी)
रोप अवस्था
वेळेवर
पेरणी केलेल्या ज्वारी पिकामध्ये पहिली कोळपणी करून घ्यावी.
करडई
रोप अवस्था
वेळेवर
पेरणी केलेल्या करडई पिकामध्ये पहिली कोळपणी करून घ्यावी.
गहू
रोप अवस्था
गहु पिकाची
पेरणी बाकी असल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. तसेच उगवुन आलेल्या गहु पिकामध्ये
पाणी व्यवस्थापन करावे.
कांदा
रोप अवस्था
कांदा
पिकाची पुर्नलागवड बाकी असल्यास करून
घ्यावी. तसेच कांदा पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
पेरू
फळ वाढीची अवस्था
पेरू
बागेमध्ये फळकुज दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के
डब्ल्यूपी किंवा झायनेब ७५ टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पेरू फळबागेत फळांची जास्त संख्या
असलेल्या फांदयांना बांबूचा आधार दयावा. जेणेकरुन फळांच्या वजनाने झाडांचे नुकसान
होणार नाही.
आंबा
बहार धरणे
आंबा बागेत
फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी १३:००:४५ विद्राव्य खताची १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
तापमानातील
चढउतारामुळे टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली
किंवा सायंट्रानिलीप्रोले १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पाणी व्यवस्थापन
करावे.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
थंडी वाढण्यास सुरवात झाली असुन थंडीपासुन बचाव करण्यासाठी जनावरे,शेळ्या तसेच कोंबडयाच्या
गोठा/शेडला बारदाण्याचे पडदे लावावेत. तसेच शेडमधील तापमान उष्ण ठेवण्यासाठी
शेडमध्ये रात्री १२ ते सकाळी ७ पर्यंत विदयुत बल्ब लावावेत. तसेच जनावरांच्या
शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी प्रथिनेयुक्त पौष्टीक चारा दयावा.
Comments
Post a Comment