छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८.० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १०.० ते १२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ६४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०१ ते ०७
डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर
कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
आद्रक
कंद वाढीची अवस्था
आद्रक पिकामध्ये कंद
वाढीसाठी ००:५२:३४ या विद्राव्य खताची मात्रा ५ किलो प्रति एकर दोन वेळा विभागुन
ठिबक सिंचनाद्वारे द्यावी.
हळद
कंद वाढीची अवस्था
हळद पिकामध्ये कंद
वाढीसाठी ००:५२:३४ या विद्राव्य खताची मात्रा ५ किलो प्रति एकर दोन वेळा विभागुन
ठिबक सिंचनाद्वारे द्यावी.
हरभरा
वाढीची अवस्था
सद्यस्थितीत तापमानातील
चढउतारामुळे हरभरा पीकामध्ये मर रोगाचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४० मिली/ग्रॅम प्रती १० लीटर
पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी किंवा पिकास आळवणी करावी.
जवस
वाढीची अवस्था
जवस तण नियंत्रणासाठी
पहिली कोळपणी करावी.
बटाटा
वाढीची अवस्था
सध्यस्थितीत तापमानातील
चढउतारामुळे बटाटा पीकामध्ये लवकर येणारा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी
मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ते ३० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम
किंवा प्रोपीनेब ७० टक्के डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. तसेच बटाटा पीकामध्ये रस शोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे व
पिवळे चिकट सापळे प्रत्येकी २५ याप्रमाने प्रति एकरी लावावेत.
मोसंबी
फळ
वाढीची अवस्था
सध्यस्थितीत तापमानातील
चढउतारामुळे मोसंबी बागेमध्ये कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी डायफेनथ्यूरॉन ५० टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक
३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १५ दिवसाच्या
अंतराने दुसरी फवारणी करावी.
डाळिंब
वाढीची
अवस्था
डाळींब फळबागेमध्ये साल
पोखरणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत असल्यास प्रादूर्भावग्रस्त खोड किंवा
फांदीवरील छिद्रामध्ये क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मीली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून इंजेक्शनच्या सहाय्याने सोडावे व नंतर छिद्रे चिखलाने बंद करावीत. तसेच
काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करावी.
भाजीपाला
फुल
ते फळ धारणा अवस्था
सध्यस्थितीत तापमानातील
चढउतारामुळे टोमॅटो पीकामध्ये करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. तसेच मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा) किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५
टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
तुती रेशीम
सद्यस्थितीमध्ये थंडीत वाढ होत असुन रेशीम कीटक संगोपनगृहातील
तापमान २० अंशच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ अंश सें.
मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा इलेकट्रीक रूम हिटरचा वापर
करावा.तापमान मर्यादित असल्यास रेशीम कीटक तुती पाने खातात व त्यांची चांगली वाढ
होते.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत
थंडी मध्ये वाढ होत असुन कुकुट पालन करणाऱ्या शेतकरी बांधवानी कोंबड्यांच्या
आहारात इलेक्ट्रोलाईटस व ब जीवनसत्वाचा
वापर करावा जेणेकरुन थंडीमूळे येणार ताण कमी होण्यास मदत होईल.
Comments
Post a Comment