छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ६८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. २७ नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ
राहील. तसेच पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी
ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
ऊस पिकामध्ये
गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये
खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २०
ईसी २० ते २५ मिली किंवा फिप्रोनील ५ एससी
३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
कापूस
बोंड धरणे ते
वेचणी
कापुस
पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणात गुलाबी
बोंडअळीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पीकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात.
प्रादूर्भाव जास्त प्रमाणास दिसून येत असल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा
प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के ईसी १० मिली किंवा लॅमडा
सायहॅलोथ्रीन ५ ईसी ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आलटून पालटून फवारणी
करावी. तसेच वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून घ्यावी.
तूर
फुलधारणा ते शेंगा धरणे अवस्था
तूर
पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असल्यास इमामेक्टीन
बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ६.६ मिली प्रती १०
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तुर पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन
करावे.
रब्बी ज्वारी
रोप ते वाढीची अवस्था
ज्वारी
पिकामध्ये तण व्यवस्थापन व अंतरमशागतीचे कामे करावीत. तसेच तापमानातील चढउतारामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन
सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत.
मका (रब्बी)
रोप ते वाढीची अवस्था
मका
पिकामध्ये तण व्यवस्थापन व अंतरमशागतीचे कामे करावीत.
करडई
रोप ते वाढीची अवस्था
वेळेवर
पेरणी केलेल्या करडई पिकामध्ये पहिली कोळपणी करून घ्यावी.
गहू
रोप अवस्था
गहू पिकाची
पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करता येते. पेरणी झाली नसल्यास लवकरात लवकर गहू पिकाची
पेरणी बीजप्रक्रिया करूनच करावी. तसेच उगवुन आलेल्या गहु पिकामध्ये पाणी व्यवस्थापन
करावे.
कांदा
रोप अवस्था
कांदा
पिकाची पुर्नलागवड बाकी असल्यास करून घ्यावी. तसेच कांदा पिकास गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे. तसेच सध्यस्थितीमध्ये
तापमानातील चढउतारामुळे कांदा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५ ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी
पेरू
फळ वाढीची अवस्था
सद्यस्थितीत
पेरू बागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
हेक्टरी २० ते २५ मिथाईल युजेनॉलची रक्षक सापळे लावावीत. तसेच काढणीस तयार
असलेल्या पेरु फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत विक्रीसाठी
पाठवावीत.
आंबा
बहार धरणे
आंबा बागेत
फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी १३:००:४५ विद्राव्य खताची १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
तापमानातील
चढउतारामुळे टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा
सायंट्रानिलीप्रोले १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. तसेच सध्यस्थितीत टोमॅटो व वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रानिलीप्रोल
१८.५ एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात
मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
थंडी वाढण्यास सुरवात झाली असुन थंडीपासुन बचाव करण्यासाठी जनावरे, शेळ्या तसेच
कोंबडयाच्या गोठा/शेडला बारदाण्याचे पडदे लावावेत. तसेच शेडमधील तापमान उष्ण
ठेवण्यासाठी शेडमध्ये रात्री १२ ते सकाळी ७ पर्यंत विदयुत बल्ब लावावेत. तसेच तसेच
जनावरांना रात्रीच्या वेळेस उघडयावर न बांधता गोठयातच बांधावे. शेतकरी बांधवांनी
शेळया व मेंढयांना सकाळी उशीरा चरण्यासाठी सोडावे व सर्दी जाणवल्यास
पशुवैदयकांच्या सल्ल्याने उपचार करावा.
Comments
Post a Comment