छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०५ ते ०९ मार्च २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३५.० ते ३८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २० ते ४५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०३ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०९ ते १५ मार्च २०२५ दरम्यान आकाश
स्वच्छ व हवामान कोरडे राहण्याची शक्यता असुन कमाल तापमान व किमान तापमान सरासरी
एवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
आद्रक
साठवणुक
आद्रक पिकाची काढणी
केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी
साठवणूक करावी.
हळद
शिजवणी व वाळवणी
हळद काढणीनंतर त्वरित सावलीत साठवणूक करावी. त्यानंतर ४ ते ५ दिवसांमध्येच
हळदीवर शिजविण्याची प्रक्रिया करावी. हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करून
घ्यावी. कारण सर्व हळकुंडांचा आकार
एकसारखा नसतो, जाडी कमी अधिक असते. त्यामुळे जाड हळकुंडांना शिजण्यास जास्त वेळ तर
लहान हळकुंडांना कमी वेळ लागतो.शिजवलेली हळद १२ ते १५ दिवस उन्हात चांगली वाळवावी.
पहिले चार दिवस दोन इंचापेक्षा जाड थर देऊ नये. ओली हळद सायंकाळी एकत्र गोळा करू
नये. हळद वाळत घालताना कठीण जागी
किंवा शेडनेट किंवा जुन्या साड्यांवर वाळवावी.काळ्या मातीत जमीन सपाट करून पसरू
नये. कारण, मातीचा ओल्या हळदीशी
संपर्क येतो शिवाय मालाची प्रत खराब
होते.पूर्ण वाळलेली व अर्धवट वाळलेली हळद एकत्र मिसळू नये. अधूनमधून हात देताना
कमी शिजलेली, जादा फुगीर हळकुंडे
त्वरित वेचून बाजूला काढावीत. अशा हळकुंडांना किमान ४ वेळा जास्त ऊन द्यावे.
वाळवलेल्या हळकुंडामध्ये आर्द्रतेचे प्रमाण ११ ते १२ टक्के एवढे असावे.
हरभरा
परिपक्वता ते काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करुन मळणी करुन घ्यावी व मळणी केलेल्या धान्याची योग्य वाळवणूक करुन सुरक्षित ठीकाणी साठवणूक
करावी.
उन्हाळी मका
रोप अवस्था
उगवून आलेल्या मका पिकास पाणी व्यवस्थापन करावे.
बटाटा
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या बटाटा पिकाची काढणी करून घ्यावी व काढणीनंतर बटाटे
शेतात पडू न देता गोळा करून आकारमानानुसार प्रतवारी करून ते जाळीदार पोत्यात भरून
बाजारात विक्रीसाठी किंवा शीतगृहात साठवणीसाठी पाठवावेत.
मोसंबी
फळधारणा अवस्था
तापमानात किंचित वाढ होत असल्यामुळे मोसंबी बागेमध्ये फुलगळ व फळगळ दिसून
येत असून याच्या व्यवस्थापनासाठी १ किलो युरिया + २ ग्रॅम एनएए किंवा प्लॅनोफिक्स
३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच बागेमध्ये गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे.
डाळिंब
फळधारणा ते फळवाढीची अवस्था
डाळींब बागेतील फळांची संख्या व आकार वाढविण्याकरीता बागेस ००:५२:३४ व
००:००:५० या विद्राव्य खते ११ किलो प्रती हेक्टर प्रत्येक वेळी याप्रमाणे ७
दिवसाच्या अंतराने ४ वेळा ड्रीपव्दारे सोडावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५
मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच
भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
तुती रेशीम
वाढीची अवस्था
तुती बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
पशुसंवर्धन
कमाल तापमानात वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील तापमान नियंत्रित
करुन स्वच्छ पीण्याच्या पाण्याचे
व्यवस्थापन करावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी
आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे.
इतर
सद्यस्थितीत हळद व आद्रक पिक काढणीच्या
अवस्थेत आहेत. या पिकांचे गुणधर्म पाहता हळदीपासुन हळदपूड, भुकटी किंवा पावडर,
हळदीचे लोणचे, कॅन्डी, ओल्या हळदीपासुन पेय इत्यादी तर आद्रक पासून सुके पावडर,
आले मुरंबा, आले वडी, आले पेस्ट, आले स्क्वॅश, अद्रक तेल, पावडर, पेय इत्यादी
मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.
Comments
Post a Comment