छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १८ ते २२ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ४१.० ते ४३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १८ ते ५६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक १७ व २१ एप्रिल २०२५ रोजी तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २० ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच सुरु ऊ...