छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ३१ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४३ ते ७४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला पिकांचेनाव ऊस सुरु ऊस लागवड / खोडवा व्यवस्थापन सुरु ऊस : सुरु ऊसाची लागवड १५ फेब्रूवारी पर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी जातिवंत बेण्याची निवड करावी. बेण्याचे वय १० ते ११ महिन्यांचे असावे. जमिनीची चांगली मशागत करून पट्टा पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे. खोडवा व्यवस्थापन : शेतक-यांनी ऊस पाचट न जाळता,पाचट एक आड एक सरीत जमा करावे. पाचट जमा करतांना पट्टा पध्दतीत पाचटाचे आच्छादन करावे किं...