छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ३१ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच कमाल
तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७.० ते १९.० अंश सेल्सिअस
दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४३ ते ७४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते १०
किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० फेब्रुवारी २०२६
दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा
कमी तर किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
सुरु ऊस लागवड /खोडवा
व्यवस्थापन
सुरु ऊस: सुरु ऊसाची
लागवड १५ फेब्रूवारी पर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी
जातिवंत बेण्याची निवड करावी. बेण्याचे वय १० ते ११ महिन्यांचे असावे. जमिनीची चांगली मशागत
करून पट्टा पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे.
खोडवा व्यवस्थापन : शेतक-यांनी ऊस पाचट न
जाळता,पाचट एक आड एक सरीत जमा करावे. पाचट जमा करतांना पट्टा पध्दतीत पाचटाचे
आच्छादन करावे किंवा कुटी यंत्राच्या साह्याने पाचटाचे कुटी करावी त्यानंतर
पाचटावर पाचट कुजविणारे जिवाणू १० किलो + शेणखत + युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट
१०० किलो प्रति हेक्टर मिसळून टाकावे व बगला फोडाव्यात. तसेच बुडखे जमीनीलगत छाटावे व छाटलेल्या बुडख्यावर
क्लोरोपायरीफॉस २० मिली + कार्बेन्डाझिम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा तसेच किडींचा प्रादुर्भाव रोखल्या जाईल.
तूर
काढणी अवस्था
तूर पीकाची कापणी करुन
घ्यावी व कापणी केलेले बंडल वाळविण्याकरीता शेतातच तूर
पीकाच्या झाडांच्या बुडांवर ठेवावे. योग्य वाळवणी झाल्यानंतर मळणी किंवा संयुक्त
पीक काढणी यंत्राव्दारे मळणी करुन धान्य वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
रब्बी ज्वारी
कणसे धरणे ते दाणे भरणे
पक्ष्यांपासून ज्वारी
पिकाच्या कणसांचे संरक्षण करण्यासाठी (उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी
स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.
मका (रब्बी)
दाणे भरणे अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरणामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून याच्या
व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम १२.६ टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी
प्रति ५ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून स्वच्छ व शांत वातावरणामध्ये फवारणी करावी.
करडई
दाणे भरणे अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरणामुळे करडई पिकावर बोंडया खाणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व
शांत वातावरणामध्ये फवारणी करावी.
गहू
पोटरी अवस्था/ दाणे भरणे अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील
चढउतारामुळे गहू पिकामध्ये खोड किड दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट ३० टक्के २० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून स्वच्छ व शांत वातावरणामध्ये फवारणी करावी. तसेच गहू पिकास गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे.
कांदा
कंद वाढीची
अवस्था
कांदा पीकास पुर्नलागवड
करुन ६० दिवस झाल्यास १३:००:४५ किंवा ००:००:५०
विद्राव्य खत १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरणामुळे कांदा पिकावरील
फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १० मिली किंवा
फिप्रोनील ५ टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत
वातावरणामध्ये फवारणी करावी.
आंबा
फुलोरा ते फळधारणा अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरणामुळे आंबा फळबागेमध्ये फळगळ वाढण्याची शक्यता असून हे टाळण्यासाठी
नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड (एनएए, ४.५
एसएल) ५.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पहिली
फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना व दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची
असताना करावी. तसेच ५० टक्के झाडावर मोहरीच्या आकाराचे फळधारना झाल्यावर झाडाला
पाणी देणे चालू करावे.
भाजीपाला
फुले ते फळधारणा
अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरण टोमॅटो पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम २५ डब्लूसी ४ मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के २० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणामध्ये फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत वातावरणात
बदल होत असल्यामुळे शेतक-यांनी जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकात अचानक बदल करु
नये. तसेच जनावरांना संतूलित आहारासोबत स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी द्यावे,
जेणेकरुन जनावरांचे बदलत्या हवामानानुसार आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल.
इतर
मका हे पौष्टीक चारा पिक
असुन मुरघास बनवतांना मका पीकाची कापणी ५० टक्के फुरो-यावर असतांना करावी.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment