छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जानेवारी २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला


 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४५ ते ७५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२ ते ०९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०७ ते १३ जानेवारी २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

 कृषि हवामान सल्ला

पिकांचेनाव

ऊस

वाढीची अवस्था

फुटवे अवस्था: मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कापूस

वेचणी

शेतकरी बांधवानी फरदड घेणे टाळावे. कापूस पिकाची शेवटची वेचणी झाल्याबरोबर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उभी कपाशी कॉटन श्रेडरच्या साहाय्याने मूलस्थानी कुटी करावी त्यानंतर युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट १०० किलो प्रति हेक्टर समप्रमाणात मिसळून टाकावे व मशागत करून केलेली कुटी मातीआड करावी जेणेकरून येणाऱ्या खरीप हंगामापर्यंत संपूर्ण कापूस कुटी कुजून जमिनीतील सेंद्रिय घटकामध्ये वाढ होईल.

तूर

परिपक्वता अवस्था

तापमानातील चढउतारामुळे तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ६.६ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तूर पिकावरील शेंगमाशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी ०८ मिली किंवा ल्युफेनुरॉन ५.४ टक्के १२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रब्‍बी ज्‍वारी

पोटरी अवस्था

सद्यस्थितीत ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन याच्या व्‍यवस्‍थापनासाठी थायामिथॉक्‍झाम १२.६ टक्‍के + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ झेडसी ५ मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. तसेच गरजेनुसार पिकास पाणी व्यवस्थापन करावे..

मका (रब्बी)

वाढीची ते फुलोरा अवस्था

मका पिकावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच प्रादुर्भाव  दिसून येत असल्यास थायमिथॉक्झाम १२.६ टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी प्रति ५ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई

बोंडया धरणे

मागील आठवडयातील तापमानातील चढउतारामुळे करडई पीकामध्ये रस शोषण करणा-या (काळा मावा) किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच करडई पिकावर अल्टरनेरीया (करपा) या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब (७५ डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गहू   

फुटवे अवस्था

तापमानातील चढउतारामुळे गहू पिकामध्ये पोंगे मर (खोडकिड) दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के २० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पीकाची पेरणी करुन २० ते ३० दिवस झालेल्या फुटवे अवस्थेतील गहू पीकास नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो याप्रमाणे प्रतिहेक्टरी दयावा.

कांदा

वाढीची अवस्था

सद्यस्थितीत कांदा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी

आंबा

बहार धरणे

सध्यस्थितीत वातावरणामध्ये धुकं पडून आंबा फळबागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीओनेट १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच आंबा बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ०३ मिली किंवा ब्युफ्रोफेझीन २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

मागील आठवडयातील तापमानातील चढउतारामुळे मिरची पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम ५० टक्के डब्लूपी १० ग्रॅम प्रति १० ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत तापमानात घट होत असल्यामुळे शेळ्या व मेंढ्या मध्ये विषाणूजन्य तोंडाचा मावा या रोगाचा प्रादूर्भाव आढळून येत असून याकरीता १० ग्रॅम बोरिक पावडर २० मिली ग्लिसरीन मध्ये मिसळून तोंडास लावावे. तसेच प्रादुर्भाव झालेल्या शेळ्या व मेंढ्याना बी-कॉम्प्लेक्स पशुवैद्यांच्या सल्याने द्यावे.

इतर

शेतक-यांनी रब्बी हंगामातील पीकांना त्यांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, जेणेकरुन ओलाव्यामुळे जमीनीतील अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होवून ताण कमी राहिल्याने किडींचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला