Posts

Showing posts from February, 2026

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०४ ते ०८ फेब्रु. २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २८ ते ६२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०८ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला पिकाचे नाव आद्रक परिपक्वता ते काढणी आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित ‘ ब्रश कटर ’ चा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्‍टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची ब...