छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २१ ते २५ फेब्रुवारी २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे राहून आकाश अंशत:ढगाळ राहील. तसेच
कमाल तापमान ३२.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते १९.० अंश
सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३३ ते ७२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग
०५ ते ०९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २५ फेब्रुवारी ते ०३ मार्च
२०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान
सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान
तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
ऊस पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. खोडवा ऊस पीकास नत्राचा दुसरा हप्ता ७५ किग्रॅ प्रति हेक्टरी दयावा. पुर्व हंगामी ऊस पिकास हलकी भर दयावी.
रब्बी ज्वारी
दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था
पक्ष्यांपासून ज्वारी पिकाच्या कणसांचे संरक्षण
करण्यासाठी (उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे,
बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.
मका (रब्बी)
दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास पाणी व्यवस्थापन
करावे.
करडई
दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास पाणी व्यवस्थापन
करावे.
गहू
दाणे भरणे अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे गहू
पिकामध्ये खोड किड दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के २०
मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत
वातावरणामध्ये फवारणी करावी. तसेच गहू पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
उन्हाळी बाजरी
वाढीची अवस्था
उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी लवकरात लवकर
बीजप्रक्रिया करूनच करावी. तसेच वेळेवर पेरणी केलेल्या बाजरी पीकास गरजेनुसार
पीकास पाणी व्यवस्थापन करावे.
कांदा
कंद वाढीची अवस्था
सद्यस्थितीत कमाल तापमानात वाढ होत असून वातावरणातील बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढत आहे तरी शेतकरी बांधवानी कांदा पिकास नियमित पाणी व्यवस्थापन करावे. तसेच कांदा पीकास पुर्नलागवड करुन महिना झाला असल्यास पीकास १९:१९:१९ खते २.५ किलो व १० किलो गंधक प्रति एकर याप्रमाणात ठिंबक सिंचनाव्दारे पाण्यातून द्यावे.
आंबा
कंद वाढीची अवस्था
सद्यस्थितीत कमाल तापमानात वाढ होत असून वातावरणातील
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढत आहे तरी
शेतकरी बांधवानी कांदा पिकास नियमित पाणी व्यवस्थापन करावे. तसेच कांदा पीकास पुर्नलागवड करुन महिना झाला असल्यास पीकास १९:१९:१९
खते २.५ किलो व १० किलो गंधक प्रति एकर याप्रमाणात ठिंबक सिंचनाव्दारे पाण्यातून
द्यावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तापमानातील चढउतारमुळे वांगी
पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी
देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी
टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा
यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी
शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात.
इतर
सद्यस्थितीत कमाल तापमानात वाढ होत असून वातावरणातील
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढत आहे. तरी
शेतकरी बांधवानी पिकांना व फळबागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच विविध
आच्छादनांचा वापर करावा, जेणेकरुन बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी होवून पाण्याच्या
पाळया कमी होतील.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment