छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०७ ते ११ फेब्रुवारी २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे
राहून आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश
सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष
आर्द्रता ३० ते ५९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०७ किमी/तास राहण्याची
शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ११ ते १७ फेब्रुवारी २०२६
दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान व किमान
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
सुरु ऊस लागवड
सुरु ऊस: सुरु ऊसाची
लागवड १५ फेब्रूवारी पर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी
जातिवंत बेण्याची निवड करावी. बेण्याचे वय १० ते ११ महिन्यांचे असावे. जमिनीची चांगली मशागत करून पट्टा
पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे.
रब्बी ज्वारी
कणसे धरणे ते दाणे भरणे
पक्ष्यांपासून ज्वारी पिकाच्या कणसांचे संरक्षण
करण्यासाठी (उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे,
बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.
मका (रब्बी)
दाणे भरणे अवस्था
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास पाणी
व्यवस्थापन करावे.
करडई
दाणे भरणे अवस्था
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास पाणी
व्यवस्थापन करावे.
गहू
दाणे भरणे अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे गहू
पिकामध्ये खोड किड दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के २०
मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत
वातावरणामध्ये फवारणी करावी. तसेच गहू पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
उन्हाळी
बाजरी
वाणांची निवड/ पेरणी
उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी १५
फेब्रुवारीपर्यंत बीजप्रक्रिया करूनच करावी.पेरणीसाठी पीपीसी-६ (परभणी संपदा), एएचबी-१६६६(प्रतिभा), श्रद्धा, सबुरी, आयसीटीपी-८२०३, डब्ल्यूसीसी-७५ इत्यादी यासारख्या अधिक
उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी.पेरणीसाठी ३-४ किलो बियाणे वापरावे व
पेरणीतील अंतर ४५ x १० सेमी ठेवावे. पेरतेवेळी ६०:३०:३० पैकी अर्धे
नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश खतमात्रा द्यावी व अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी
द्यावे.
कांदा
कंद वाढीची अवस्था
कांदा पिकामध्ये प्रमाणापेक्षा अधिक पाणी
दिल्यामुळे होणारी कंदसड रोखण्यासाठी जैविक बुरशीनाशके (ट्रायकोडर्मा) १ लिटर
प्रति एकर किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड २०
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
आंबा
फुलोरा ते फळधारणा अवस्था
तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे आंबा
फळबागेमध्ये फळगळ दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड
(एनएए, ४.५ एसएल) ५.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पहिली
फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना व दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची
असताना करावी. तसेच ५० टक्के झाडावर मोहरीच्या आकाराचे फळधारना झाल्यावर झाडाला
पाणी देणे चालू करावे. तसेच आंबा बागेमध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असून याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड
२०-२५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.तसेच भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत वातावरणात
बदल होत असल्यामुळे शेतक-यांनी जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकात अचानक बदल करु
नये. तसेच जनावरांना संतूलित आहारासोबत स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी द्यावे,
जेणेकरुन जनावरांचे बदलत्या हवामानानुसार आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल.
इतर
मका हे पौष्टीक चारा पिक
असुन मुरघास बनवतांना मका पीकाची कापणी ५० टक्के फुरो-यावर असतांना करावी.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment