छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २८ फेब्रुवारी ते ०४ मार्च २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला पत्रिका


 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे राहून आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३५.० ते ३७.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १६ ते ५७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९  ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० मार्च २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.

 कृषि हवामान सल्ला

पिकांचेनाव

ऊस

फुटवे अवस्था ते कांडे धरणे

ऊस पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. खोडवा ऊस पीकास नत्राचा दुसरा हप्ता ७५ किग्रॅ प्रति हेक्टरी दयावा. पुर्व हंगामी ऊस पिकास हलकी भर दयावी.

रब्‍बी ज्‍वारी

परिपक्वता ते काढणी अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या ज्वारी पिकाची काढणी/कापणी करुन घ्यावी. तसेच काढणी झालेल्या पिकाची मळणी करून धांन्यास ऊन देऊन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

मका (रब्बी)

 परिपक्वता ते काढणी अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या मका (रब्बी) पिकाची काढणी करुन घ्यावी. तसेच काढणी झालेल्या पिकाची मळणी करून धांन्यास ऊन देऊन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

करडई

परिपक्वता ते काढणी अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी/कापणी करुन घ्यावी. तसेच काढणी झालेल्या पिकाची मळणी करून धांन्यास ऊन देऊन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

गहू   

परिपक्वता ते काढणी अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी/कापणी करुन घ्यावी. तसेच काढणी झालेल्या पिकाची मळणी करून धांन्यास ऊन देऊन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी बाजरी

रोपावस्था

उन्हाळी बाजरी पिकास तण नियंत्रणाची कामे करून पाणी व्यवस्थापन करावे.

कांदा

कंद वाढीची अवस्था

सद्यस्थितीत कमाल तापमानात वाढ होत असून वातावरणातील बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढत आहे तरी शेतकरी बांधवानी कांदा पिकास नियमित पाणी व्यवस्थापन करावे. तसेच कांदा पीकास पुर्नलागवड करुन महिना झाला असल्यास पीकास १९:१९:१९ खते २.५ किलो व १० किलो गंधक प्रति एकर याप्रमाणात ठिंबक सिंचनाव्दारे पाण्यातून द्यावे.

आंबा

फळधारणा अवस्था

सद्यस्थितीत तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे आंबा फळबागेमध्ये फळगळ दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड (एनएए, ४.५ एसएल) ५.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना व दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची असताना करावी. तसेच आंबा बागेतील फळगळ रोखण्यासाठी बागेत पाण्याच्या नियमित पाळया दयाव्यात.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तापमानातील चढउतारमुळे वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुसंवर्धन

जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात.

इतर

सद्यस्थितीत कमाल तापमानात वाढ होत असून वातावरणातील बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढत आहे. तरी शेतकरी बांधवानी पिकांना व फळबागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच विविध आच्छादनांचा वापर करावा, जेणेकरुन बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी होवून पाण्याच्या पाळया कमी होतील.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला