छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २१ ते २५ मार्च २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र,
मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ
ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३५.०
ते ३८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व
सापेक्ष आर्द्रता १४ ते ५९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक २० मार्च २०२६ रोजी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीऐवढे तसेच कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
सद्यस्थितीत हंगामी ऊस
पिकाची लागवड करून दीड महिन्याचा कालावधी झाला असल्यास १०० किलो नत्र प्रती हेक्टरी
युरीयाव्दारे दयावे. तसेच ऊस पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
गहू
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी/कापणी करुन घ्यावी. तसेच काढणी झालेल्या
पिकाची मळणी करून धांन्यास ऊन देऊन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
उन्हाळी बाजरी
फुटवे अवस्था
बाजरी पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व पिकास
पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
कांदा
कंद वाढीची
अवस्था
तापमानातील चढउतारामुळे कांदा पिकामध्ये करपा
रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५
ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबा
फळ वाढीची अवस्था
आंबा बागेमध्ये फळ गळ दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन
करावे. तसेच तापमानातील चढउतारमुळे
वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
कोंबडयांच्या शेडमधील तापमान नियंत्रित करुन
पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे.
तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या
वेळेत द्यावे.
इतर
मागील
दोन दिवसामध्ये जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच गारपीट झालेली
असुन शेतकरी बांधवानी आपल्या बागेमध्ये पडलेली फळे जमा करून नष्ठ करावीत तसेच
तुटलेल्या फांद्या व्यवस्थित कट करून १ % बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment