छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १५ ते १९ जुन २०२४ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३५.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५७ ते ९९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते १९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १४ जून २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार तर दि. १७ जून २०२४ रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १९ ते २५ जून २०२४ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था ऊस पिकामध्ये मोठी बांधणी करून घ्यावी. तसेच पिक १०० ते १२० दिवसाचे झाले ...