छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०८ ते १२ जुन २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३८.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.० ते २७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २४ ते ६० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०७ जून २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार तर दि. ०८ ते १० जून २०२४ रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन     वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १२ ते १८ जून २०२४ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

कांडे धरणे 

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडा दिसून येत असुन याच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ - ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत फवारणी करावी. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कापूस

वाणांची निवड

जमीन,कोरडवाहू किंवा बागायती,लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यानुसार कापूस पिकाच्या लागवडीकरता वाणांची निवड करावी.

का

वाणांची निवड

मका पिकाच्या लागवडीसाठी नवज्योत, मांजरा,डीएमएच-१०७, के एच-९४५१, एमएचएच, प्रभात, करवीर, डेक्कन-१०३ पिनॅकल इत्यादी या सारख्या सुधारित वाणांची निवड करावी.

तूर

वाणांची निवड

तूर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-७११,बीडीएन २०१३-४१(गोदावरी), बीडीएन-७०८, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६, बीडीएन-७१६ या सारख्या सुधारित वाणांची निवड करावी.

मूग/उडीद

वाणांची निवड

मूग लागवडीसाठी बीएम -४, कोपरगांव, बीपीएमआर-१४५, बीएम-२००२-१, बीएम-२००३-२, फुलेमुग-२, पीकेव्हीकेएम-४ या वाणांची तर उडीद लागवडीसाठी बिडीयु -१, टीएयु -१, टीपीयु -४ या वाणांची निवड करावी.

सिताफळ

लागवड पूर्व नियोजन

सिताफळाच्या नवीन  लागवडीसाठी ४५ x ४५ x ४५ सेमी आकाराचे खड्डे घेऊन त्यात दिड ते दोन घमेले शेणखत किंवा चांगले कुजलेले कंपोस्ट खत अर्धा किलो सुपर फॉस्फेट व फोलिडोल पावडर व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते खडे भरावे.

आंबा

लागवड पूर्व नियोजन

नवीन आंबा रोपे लागवडीसाठी १ x x १ आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट ५० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत व पोयटा माती या सर्व मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत.

भाजीपाला

रोपे तयार करणे

खरीप हंगातात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटीकेत गादी वाफयावर बियाण्‍याची लागवड करून रोपे तयार करावीत. तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी व सायंकाळच्या वेळेस करावी.  

चारा पिके

वाणांची निवड

शेतक-यांनी जनावरांना हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होण्यासाठी डीएचएन-६ व गुणवंत या वाणांची लागवड करावी.

पशुसंवर्धन

जिल्ह्यामध्ये दिनांक ०७ ते १० जून २०२४ दरम्यान  विजेचा कडकडाट, वादळीवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे शेतक-यांनी पशुधनास सुरक्षित ठिकाणी बांधावे तसेच खुले पाणी, तलाव किंवा नदी यांपासुन दुर ठेवावे. पशुंना पाऊस चालु होण्याच्या वेळेस झाडाखाली किंवा झाडाच्या आडोशाला जमा होवू देवू नये. तसेच पावसाळा सुरु होण्यापूर्वी जनावरांच्या गोठ्याची दुरुस्ती करून घ्यावी तसेच पावसाळ्यातील प्राणघातक रोग जसे कि, घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत इत्यादी जीवघेण्या रोगापासून जनावरांच्या बचावासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.

इतर

हुमणी कीड बहू भक्ष कीड असून सायंकाळच्या वेळी बाभूळ, लिंब व तुतीच्या झाडावर भुंगे बसतात. नर मादी मिलनानंतर मादी सेनखावर अंडी घालते व अंडी फुटून पिल्ले बाहेर येतात व पेरणीनंतर सोयाबीन ऊस व तुतीच्या इत्यादी पिकांची मूळ खातात. याच्या नियंत्रणासाठी १ प्रकाश सापळा प्रति हेक्टर लावावेत. खालील बाजूस टोपलीत रॉकेल टाकून भुंगे मारावेत किंवा ८ किलो ग्रॅम प्रति एकर प्रमाणे फोरेट दाणेदार कीटकनाशक प्रादुर्भावग्रस्त भागात टाकावे.

सध्यस्थितीत काही ठिकाणी पडणारा पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस असून मान्सूनचा पाऊस येण्यास अवकाश आहे, तरी शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य हंगामी पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाल्याशिवाय तसेच जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला