छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ फेब्रुवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३४.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३९ ते ५२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १९ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे ऊस पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. खोडवा ऊस पीकास नत्राचा दुसरा हप्ता ७५ किग्रॅ प्रति हेक्टरी दयावा. पुर्व हंगामी ऊस पिकास हलकी भर दयावी . रब्बी ज्वारी दाणे भरणे अवस्था पक्ष्यांपासून ज्वारी पिकाच्या कणसांचे संरक्षण करण्यासाठी (उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात. मक...