छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १२ ते १६ फेब्रुवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५० ते ६७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १६ ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान
आकाश स्वच्छ व हवामान कोरडे राहील. तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
आद्रक
काढणी
आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाने
सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित ब्रश कटर चा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा.
पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड
असल्यास ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. काढणी
केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी
साठवणूक करावी.
हळद
काढणी
हळद पिकाची काढणी जमिनीत योग्य ओलावा बघून करावी. कंद काढणीपूर्वी
राहिलेली पाने जमिनीलगत कापून घ्यावीत. जर हळद पिकाची लागवड सरीवरंबा पद्धतीने
केली असल्यास काढणी कुदळीच्या सहाय्याने करावी व लागवड गादीवाफ्यावर केली असल्यास
काढणी यंत्राच्या सहाय्याने करावी. काढणी
करत असताना गडडयांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणी करताना जेठे गड्डे व
हळकुंडे वेगळी करावीत व काढणीनंतर योग्य ठिकाणी साठवणूक करावी.
हरभरा
दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था
उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असुन याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम किंवा क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के ३
मिलि प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. तसेच
पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
जवस
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या जवस पिकाची काढणी करुन घ्यावी.
उन्हाळी मका
वाणांची निवड
उन्हाळी मका पिकाची लागवडीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-१०७, केएच-९४५१, डेक्कन-१०३,
१०५ यासारख्या शिफारसीत वाणांची निवड
करावी.
बटाटा
परिपक्वता ते काढणी अवस्था
काढणीपूर्वी बटाटा पिकास १० ते १२ दिवस पाणी देणे बंद करावे. त्यामुळे
बटाट्याची साल घट्ट होते आणि बटाट्यास चकाकी येते. पाणी बंद केल्यावर झाडे
जमिनीलगत बुंध्याजवळ विळयाच्या सहाय्याने कापून घ्यावीत व कापलेली झाडे
काढणीपर्यंत त्याच ठिकाणी ठेवावीत. जेणेकरून बटाटे हिरवे पडण्याचे प्रमाण कमी
होईल.
मोसंबी
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे मोसंबी बागेमध्ये फुलगळ व फळगळ दिसून
येत असून याच्या व्यवस्थापनासाठी १ किलो युरिया + २ ग्रॅम एनएए किंवा प्लॅनोफिक्स
३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच बागेमध्ये गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे.
डाळिंब
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
डाळींब बागेत परागीभवन होणे महत्वाचे असते.यामध्ये मधमाश्यांची भुमिका
महत्वाची असुन मधमाश्या आकर्षित करण्यासाठी २ किलो गुळ + २-३ लिटर ताक यांचे
एकसमान मिश्रण करुन २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेणेकरुन मधमाश्यांचे
प्रमाण वाढण्यास मदत होईल.तसेच बागेमध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
फळ धारणा ते
फळवाढीची अवस्था
मागील आठवड्यातील तापमानातील
चढउतारामुळे भेंडी पिकावर रस शोषण करणाऱ्या (तुडतुडे/पांढरीमाशी/मावा) किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी २३ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला
पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पिकास पाणी द्यावे व काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम
वाढीची अवस्था
रेशीम कोषाचा ए-ग्रेड उत्तम प्रकारे मिळवण्यासाठी किटक संगोपन कौशल्य
आत्मसात करणे गरजेचे आहे. खादय म्हणून तूती पानात पाण्याचे प्रमाण ८० टक्के
मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत ६ ते ७ दिवसाला तर भारी जमिनीत
१०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया
द्याव्यात.
पशुसंवर्धन
सध्य स्थितीत जनावरांमध्ये गोचीड या रक्त शोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी नियमित गोठ्याची स्वछता करणे गरजेचे
आहे तसेच पशुधनावर ५ टक्के निबोळी अर्काचा शिडकाव आठ्वड्यातून दोन वेळा करणे
गरजेचे आहे.
इतर
शेतक-यांनी कापुस
व तुर पिकांच्या काढणीनंतर रान तयार करुन पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी
भाजीपाला पिकांची लागवड करावी.
Comments
Post a Comment