छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १४ ते १८ जुन २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६० ते ९१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. १३ जून २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. १४ जून २०२५ रोजी जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १८ ते २४ जुन २०२५ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था ऊस पिकामध्ये मोठी बांधणी करून घ्यावी. तसेच पिक १०० ते १२० दिवसाचे झाले असल्यास पिकास जमिनीतून खत देणे टाळावे, याव्यत...