छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०४ ते ०८ जून २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३४.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४७ ते ७६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६ ते १८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात दिनांक ०४,०५ व ०७ जून २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या
कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३०
ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०८ ते १४ जुन २०२५ दरम्यान हवामान
अंशत:ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता असुन पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल
तापमान व किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
पिकाचे नाव
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
वाणांची निवड
सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करावीत. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी एमएयुएस-१५८, एमएयुएस-१६२, एमएयुएस-६१२, एमएयुएस-७२५, केडीएस-७२६, केडीएस-७५३ यासारख्या
अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी.
खरीप ज्वारी
वाणांची निवड
खरीप ज्वारी पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण
करावीत. खरीप ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी, परभणी-शक्ती, एसपीव्ही-९६०, सीएसएच-२५,
परभणी- श्वेता, पीव्हीके-८०९,
पीव्हीके-८०१ यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी.
बाजरी
वाणांची निवड
बाजरी पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करावीत. बाजरी पिकाच्या लागवडीसाठी, धनशक्ती,
परभणी संपदा, एएचबी-१२००, एएचबी -१२६९, आयसीटीपी, श्रद्धा आणि सबुरी यासारख्या
सुधारित वाणांची निवड करावी.
आद्रक
वाणांची निवड
आद्रक पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण
करावीत. आद्रक पिकाच्या लागवडीसाठी, माहिम, रिओ दि जानिरो, सुरुची, सुप्रभा या
सुधारित वाणांची निवड करावी.
हळद
वाणांची निवड
हळद पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करावीत. हळद पिकाच्या लागवडीसाठी, सेलम, कृष्णा, राजापुरी, वायगाव, टेकून आणि पेंटा यासारख्या सुधारित वाणांची निवड करावी.
मोसंबी
जातीची निवड/ वाढीची अवस्था
वनामकृवि, परभणी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या नवीन
मोसंबी बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सालगुडी, काटोल गोल्ड तर लिंबू बाग
लागवडीसाठी साई सरबती, प्रमालिनी,
पीकेएम-१ या वाणांची निवड करावी. जुन्या
बागेत आंतरमशागतीची कामे पुर्ण करुन घ्यावीत. बोर्डो पेस्ट लावला नसल्यास लावून
घ्यावा.
डाळिंब
जातीची निवड/ वाढीची अवस्था
डाळिंब पिकाच्या नवीन लागवडीसाठी वनामकृवि, परभणी विद्यापीठाने शिफारशीत
केलेल्या भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता इत्यादी वाणांची निवड करावी.
जुन्या बागेत आंतरमशागतीची कामे पुर्ण करुन घ्यावीत.
भाजीपाला
लागवड पूर्व नियोजन
खरीप हंगामातील भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी ३
X २ मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. त्यामध्ये ३-४ किलो चांगले कुजलेले
शेणखत, १५:१५:१५ हे मिश्रखत २०० ग्रॅम व शिफारशीत दाणेदार कीटकनाशक चांगले मिसळून
घ्यावे. भाजीपाल्याचे बियाणे ३-४ सें.मी. खोलीवर पेरून मातीने झाकावे. त्यानंतर
झारीच्या साहाय्याने हलके पाणी द्यावे.
तुती रेशीम
पूर्वमशागत
पट्टा पद्धत तुती लागवडीत शेंद्रीय पदार्थाचे किंवा पॉलिथिन आच्छादनाचा
वापर करावा. शेंद्रीय आच्छादनात गवत, काडीकचरा
पिकांचे अवशेष, झाडांची पाने, उसाची पाचट इत्यादी किंवा साखर
कारखान्यातील मळी याचा वापर करावा. पट्टा पद्धत तुती लागवडीत एकास आड एक पट्यात २ x २.५ x १.५ फूट आकाराची चर
करून त्यात वरील शेंद्रीय पदार्थ भरावेत.
पशुसंवर्धन
पावसाळ्यातील प्राणघातक रोग जसे कि, घटसर्प,
फऱ्या, लाळ्या खुरकूत इत्यादी जीवघेण्या रोगापासून जनावरांच्या बचावासाठी
पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.
इतर
शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील पीकांच्या
लागवडीकरीता पुर्वमशागतीची कामे करुन घ्यावीत. तसेच सध्यस्थितीत
मान्सूनचा पाऊस येण्यास अवकाश आहे, तरी शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य हंगामी पाऊस (७५ ते १००
मि.मि.) झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
Comments
Post a Comment