छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १७ ते २१ मे २०२३ साठी हवामान अंदाज

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३० ते ६९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २१ ते २७ मे २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

उन्हाळी मका

दाणे भरणे अवस्था

मका पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

मोसंबी

फळवाढीची अवस्था

सध्यस्थितीत तापमानातील वाढ लक्षात घेता मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी व बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच बागेत पिकांचे अवशेष/गवताचे आच्छादनाचा वापर करावा.

डाळिंब

मृग बहार

मृग बहार घेण्याचे नियोजन असल्यास बाग ताणावर असताना मे महिन्याच्या शेवटी इथेफोन ३९ % एस एल ची फवारणी करून पानगळ करून घ्यावी व नंतर हलकी छाटणी करून घ्यावी. छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शेंड्याकडून १० ते १५ सेमी पर्यंत छाटाव्यात तसेच वाळलेल्या फांद्या छाटाव्यात व बागेत पडलेला काडीकचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

सध्यस्थितीत तापमानातील वाढ लक्षात घेता भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी व पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच भाजीपाला पिकाची काढणी शक्यतो सकाळी व सायंकाळच्या वेळेस करावी. तसेच मिरची पिकामध्ये पांढ-या माशीच्या प्रादुर्भाव दिसून येत सुन याच्या व्यवस्थापनासाठी फेन्प्रोपॅथ्रीन ३० ईसी ३.५ मिली किंवा पायरीप्रॉक्झीफेन १० टक्के ईसी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम

रेशीम किटक संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मर्यादित (२२ ते २८ सें.ग्रे.) ठेवावे जेणेकरून कोष उत्पादन चांगले येईल. परंतु ३५ सें.ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक पाने खात नाहीत यामुळे उत्पादनात घट होते.

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत गाई, म्हशी व शेळ्या, मेंढ्याना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. तसेच तापमानात वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील तापमान ‍नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे.

इतर

शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील पीकांच्या लागवडीकरीता पुर्वमशागतीची कामे करुन घ्यावीत.

सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतक-यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांना व फळबागेस सकाळ व सायंकाळच्या वेळेस संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तसेच शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना प्रखर सूर्य प्रकाश असताना दुपारच्या वेळेत काम करणे टाळावे.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला