छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०५ ते ०९ मे २०२३ साठी हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. ०५ ते ०७ मे २०२३ रोजी तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३६.० ते ३८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते २०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३५ ते ७६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता : छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. ४ व ५ मे २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते
मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास)
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात
दिनांक ७ ते १३ मे २०२३ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच
पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व
किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
कांडे धरणे
सुरु ऊस
पीकाची लागवड करुन ३ ते ४ महिने झालेले असल्यास प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र
युरीयाव्दारे द्यावे.
उन्हाळी बाजरी
दाणे भरणे अवस्था
बाजरी
पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
आंबा
फळ वाढीची ते परिपक्वता अवस्था
मागील
आठवडयातील वादळीवारा व पावसामुळे गळून पडलेल्या आंब्याच्या कै-या वेचून घ्याव्यात. तसेच काढणीस
तयार असलेल्या आंबा फळांची सकाळ व सायंकाळच्या वेळेस काढणी करुन घ्यावी. आंबा
फळांची काढणी देठासहित करावी जेणेकरुन फळांचे काढणी पश्चात आयुष्य वाढून पक्वता
एकावेळेस होण्यास मदत होते.
भाजीपाला
फुले ते फळधारणा
अवस्था
मागील
आठवडयातील वादळीवारा व पावसामुळे गळून पडलेले टोमॅटो जमा करुन नष्ट करावीत. वादळीवाऱ्यासह
पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून
घ्यावी, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल. फळधारणा
झालेल्या टोमॅटो पिकामध्ये काठी व दोरीच्या सहाय्याने आधार दयावा. तसेच भाजीपाला पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होऊ
नये यासाठी शिफारसीत बुरशीनाशकाची पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
चारा पिके
काढणीस
तयार असलेला हिरवा चारा कापणी करुन जनावरांना दुपारच्या वेळेस खाण्यास द्यावा.
पशुसंवर्धन
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असुन सर्व
शेतकरी बांधवानी पाऊस चालू असताना जनावरे बाहेर चरावयास सोडू नये व जनावरांना
बाहेर न बांधता गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावे. तसेच पशुधनास खुले पाणी तलाव व
नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅक्टर व इतर धातूंच्या शेती अवजारांना व झाडाखाली
बांधणे टाळावे.
इतर
शेतक-यांनी
मागील दोन वर्षी नांगरणी केली नसल्यास खोल नांगरणी करुन घ्यावी. जेणेकरुन
नांगरटीनंतर जमीन उन्हात तापून जमीनीतील किड व रोगकारक बुरशींच्या सुप्तावस्था
नष्ट होण्यास मदत होईल. तसेच नांगरणी केलेल्या शेतामध्ये रोटाव्हेटरचा वापर करणे
टाळावे.
Comments
Post a Comment