छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०६ ते १० एप्रिल २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशतःढगाळ राहून दि. ८ ते १० एप्रिल २०२४ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १८ ते ७८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ९ ते २० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता
: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ७, ८ व ९
एप्रिल २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या
कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३०
ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दिनांक १० ते १६ एप्रिल २०२४ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ राहील.
तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा
कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
कांडे धरणे
तापमानातील
होणारी वाढ लक्षात घेता पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.तसेच हंगामी ऊस
पिकाची लागवड करून दीड महिन्याचा कालावधी झाला असल्यास १०० किलो नत्र प्रती हेक्टरी
युरीयाव्दारे दयावे. तसेच ऊस पिकामध्ये
खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी एकरी १० कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त
दिसून येत असल्यास क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी १५ मीली किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल
१८.५ टक्के एससी ०४ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात
फवारणी करावी.
उन्हाळी बाजरी
फुटवे अवस्था
बाजरी
पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व पिकास पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला
असल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसेच तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता
पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
आंबा
फळ
वाढीची अवस्था
तापमानात
होत असलेल्या वाढीमुळे आंबा बागेमध्ये फळ गळ दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. तसेच आंबा फळबागेतील झाडांच्या आळ्यामध्ये गवत, पालापाचोळा इत्यादी
आच्छादनांचा वापर करून गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच दि.०७ ते ०९ एप्रिल
२०२४ रोजी वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवानी काढणीस तयार
असलेल्या फळांची काढणी करावी जेणेकरून वादळी वाऱ्यामुळे होणारे संभाव्य नुकसान
टाळता येईल.
भाजीपाला
फुले ते
फळधारणा अवस्था
तापमानातील
होणारी वाढ लक्षात घेता भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच टोमॅटो
पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
थायमिथॉक्झाम २५ डब्लूसी ४ मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के २० मिली प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ व
शांत वातावरणात फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकात रस
शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची)
एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.
चारा पिके
दिनांक ०७
ते ०९ एप्रिल २०२४ रोजी तुरळक ठिकाणी
वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम
स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवानी ज्वारी पिकाचा कडबा शेतात न पडु
देता जमा करून गंजी मारावी व ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून ठेवावा. जेणेकरून
पावसामुळे कडब्याची प्रत खराब होणार नाही.
पशुसंवर्धन
दिनांक ०७
ते ०९ एप्रिल २०२४ रोजी तुरळक ठिकाणी
वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम
स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन सर्व शेतकरी बांधवानी पाऊस चालू असताना जनावरे
बाहेर चरावयास सोडू नये व जनावरांना बाहेर न बांधता गोठ्यात सुरक्षित ठिकाणी
बांधावे.
इतर
छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात पुढील दोन ते तीन दिवस वादळीवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन
शेतकरी बांधवांनी काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पीकाची लवकरात लवकर काढणी करुन
घ्यावी तसेच काढणी केलेल्या कांदा पीकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
Comments
Post a Comment