छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०३ ते ०७ जुलै २०२४ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५० ते ८१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २६ ते ३० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०७ ते १३ जुलै २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.      

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

पेरणी ते रोप अवस्था

सोयाबीन पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी. तसेच सोयाबीन पिकाची लागवड झाली नसल्यास जमिनीमध्ये पुरेशा ओलावा बघुन लागवड करावी.

खरीप ज्वारी

पेरणी ते रोप अवस्था

खरीप ज्वारी पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी. तसेच खरीप ज्वारी पिकाची लागवड झाली नसल्यास जमिनीमध्ये पुरेशा ओलावा बघुन लागवड करावी.

बाजरी

पेरणी ते रोप अवस्था

बाजरी पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी. तसेच बाजरी पिकाची लागवड झाली नसल्यास जमिनीमध्ये पुरेशा ओलावा बघुन लागवड करावी.

खरीप भुईमूग 

पेरणी ते रोप अवस्था

खरीप भुईमूग पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी. तसेच खरीप भुईमूग पिकाची लागवड झाली नसल्यास जमिनीमध्ये पुरेशा ओलावा बघुन लागवड करावी.

आद्रक

रोप अवस्था

आद्रक पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी.

हळद

रोप अवस्था

हळद पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी.

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होण्याची शक्यता असते, यासाठी प्रतीबंधात्मक उपाय म्हणुन कार्बेनडेझीम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

डाळिंब

वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलिप्रोल १०.२३ टक्के ओ. डी. ७.५ मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर नाग अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी सायनॅन्ट्रीनिलिप्रॉल १०.२६. टक्के ओडी १८ मिली किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के डब्ल्यूपी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

पावसाळयात ढगाळ वातावरणात संगोपन गृहातील तापमान २२ अं.से ते २८ अं.से. च्या दरम्यान ठेवावे आणि आर्द्रता ८० ते ८५ टक्के ठेवावी. जास्त तापमान व आर्द्रता राहिल्यास रेशीम किटकांवर ग्रासरी रोगाचा प्रादूर्भाव जाणवतो. किटकांचे (अळीचे) शरीर सुजल्यासारखे होते. दूधाळ द्रव बाहेर पडतो. रॅकवर जास्त ओला पाला जास्त प्रमाणात टाकु नये. फांदया खादय आवश्यकतेप्रमाणे दिवसातुन तीन वेळा दयावे. दोन कोषाच्या पिकाच्या दरम्यान आठ दिवसाचा खंड ठेवावा आणि निर्जंतुकीकरण द्रावण २०० मिली प्रति चौरस मीटर याप्रमाणे संगोपन गृहाच्या आत चारही बाजूने व रॅकवर फवारुन घ्यावे. असे ५० ग्रॅम १०० लिटर पाण्यासोबत किंवा सॅनिटेक (क्लोरीन डायऑक्साईड) २.५ टक्के किंवा २ टक्के ब्लीचींग पावडर + चूना द्रावण ०.३ टक्के (१० लिटर मध्ये २०० मिली ब्लीचींग पावडर + ३० ग्रॅम चूना द्रावण) प्रमाणे फवारणी करावी.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत शेळ्यांच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच शेडमध्ये चुना टाकावा जेणेकरून बाहेरून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच  शेळ्या व शेळ्यांची पिले खनिजाच्या अभावामुळे माती चाटतात त्यामुळे त्यांना हगवण सदृष्य यासारखे आजार होतात ते टाळण्यासाठी शेळ्यांना व पिल्लाना पावसाळ्यातसुद्धा खनिज मिश्रण किंवा चाटण वीट चालू ठेवावे.

इतर

शेतक-यांनी पीकांची पेरणी/लागवड बीज प्रक्रिया करूनच करावी. बीजप्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक व जैविक खते याप्रमाणे करावी.  

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला