छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०४ ते ०८ सप्टेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून बहूतांश ठीकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २६.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०३ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी ‍वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०८ ते १४ सप्टेंबर २०२४ दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरी ऐवढे, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

शेंगा लागणे ते दाणे भरणे अवस्था

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकात अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फ्लूबेन्डामाईड ३९.३५ एस सी ०३ मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी ०३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. 

खरीप ज्वारी

कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्था

मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये मिजमाशीचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन मॅलाथिऑन किटकनाशकाची ५ टक्के भुकटी २० किलो याप्रमाणे प्रति हेक्टरी स्वच्छ वातावरणात धुरळणी करावी. तसेच मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे ज्वारी पिकात अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

बाजरी

कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्था

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे बाजरी पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

खरीप भुईमूग 

शेंगा लागणे अवस्था

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे भुईमूग पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

आद्रक

फुटवे ते कंद धरणे अवस्‍था

सध्यस्थितीत अद्रक पिकामध्ये सुत्रकूर्मीचा (मुळावरील गाठी) प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी पॅसिलोमायसीस या जैविक बुरशीची १ किलो/लिटर प्रति एकर  २०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. तसेच मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे आद्रक पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

हळद

फुटवे ते कंद धरणे अवस्‍था

मागील काही दिवसांमधील दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हळद पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

मागील दोन दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे मोसंबी बागेतील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे मोसंबी बागेत फळगळ झाली असून, बागेतील खाली पडलेले खराब फळे वेचून नष्ट करावीत.

डाळिंब

फळ वाढीची अवस्‍था

मागील दोन दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे डाळिंब बागेतील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील दोन दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम

रेशीम किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.    

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत जनावरे शेतात चरत असतांना जनावरांना जखमा होऊन त्यामध्ये अळया होतात. अशा वेळी शेतकरी बांधवांनी प्रथमोपचार म्हणून १ ते २ कापुरवडी व खोबरे तेल एकत्र मिसळून किंवा औषधी दुकानातील टर्पेन्टाईन तेलात भिजलेला कापसाचा बोळा जखमेवर सतत २ ते ३ दिवस बसविल्यास सर्व अळया मरतात. जखम जर मोठी असल्यास पशुवैद्यकाच्या सहाय्याने आयव्हरमेक्टीन इंजेक्शन द्यावे.

इतर

सद्यस्थितीत पीकावरील किड व किटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतामध्ये औषधांच्या रिकाम्या बादल्या पडून राहतात. अशा ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये जनावरे पाणी पिऊन त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी फवारुन झाल्यानंतर औषधांच्या रिकाम्या बादल्यांची योग्य विल्हेवाट लावावी व जनावरांना इतरत्र कुठेही पाणी न पाजवता स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे आणि जर विषबाधा दिसून येत असल्यास पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला