छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४० ते ६६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच
पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची
शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
आद्रक
कंद वाढीची अवस्था
आद्रक पिकामध्ये
गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. तसेच अद्रक
पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
मेटॅलॅक्झील ४ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के
२५ ग्रॅम प्रति १० पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
हळद
कंद वाढीची अवस्था
हळद
पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. तसेच हळद
पीकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
अझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के एससी १० मिली प्रति १०
लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हरभरा
रोप ते वाढीची अवस्था
हरभरा तण
नियंत्रणासाठी पहिली कोळपणी करावी.
जवस
रोप ते वाढीची अवस्था
जवस तण
नियंत्रणासाठी पहिली कोळपणी करावी.
बटाटा
रोप ते वाढीची अवस्था
बटाटा
पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.
मोसंबी
वाढीची अवस्था
नवीन लागवड केलेल्या
मोसंबी रोपांमध्ये जमिनीलगत अतिओलाव्यामुळे फायटोप्थोरा बुरशीचा
प्रादुर्भाव होऊन रोपांची पाने पीवळी पडुन गळत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
खोडालगत ५ ते १० सेमी पर्यंत माती लावुन लगेच कॉपर ऑक्झीक्लोराईड या बुरशीनाशकाची
२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून ८ दिवसाच्या अंतराने दोन वेळा आळवणी करावी.
मोसंबी फळझाडांना बोर्डो मिश्रण लावुन घ्यावे.
डाळिंब
वाढीची अवस्था
सद्यस्थितीत
डाळिंब बागेमध्ये पीनहोल बोरर या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी ४ किलो लाल माती (काव) + इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी २० मिली + कॉपर ऑक्झीक्लोराईड ५० टक्के
डब्ल्यूपी २५ ग्रॅम १० लीटर पाणी घेवून द्रावण तयार करुन झाडांच्या खोडास लावावे.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
सध्यस्थितीमध्ये
तापमानातील चढउतारमूळे टोमॅटो पीकामध्ये
करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५
टक्के किंवा क्लोरोथॅलोनील ७५ टक्के २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. तसेच मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा ) किडीच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुती रेशीम
सद्यस्थितीमध्ये थंडीत वाढ होत असुन रेशीम कीटक संगोपनगृहातील
तापमान २० अंशच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ अंश सें.
मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा इलेकट्रीक रूम हिटरचा वापर
करावा.तापमान मर्यादित असल्यास रेशीम कीटक तुती पाने खातात व त्यांची चांगली वाढ
होते.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत थंडी मध्ये वाढ होत असुन कुकुट पालन करणाऱ्या शेतकरी बांधवानी
कोंबड्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व ब
जीवनसत्वाचा वापर करावा जेणेकरुन थंडीमूळे येणार ताण कमी होण्यास मदत होईल.
इतर
आवळयामध्ये ॲन्टीऑक्सीडन्ट व जीवनसत्व क भरपुर प्रमाणात असल्यामुळे त्याचे मुल्यवर्धन
करुन आवळयापासून आवळा लोणचे, आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळा मुरंबा इत्यादी मूल्यवर्धित
पदार्थाची निर्मिती करता येते.
Comments
Post a Comment