छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०८ ते १२ मार्च २०२५ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३६.० ते ३९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १७ ते ३२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२ ते ०६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १२ ते १८ मार्च २०२५
दरम्यान हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ राहील. तसेच कमाल
तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
ऊस पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. खोडवा ऊस पीकास नत्राचा दुसरा हप्ता ७५
किग्रॅ प्रति हेक्टरी दयावा. पुर्व हंगामी ऊस
पिकास हलकी भर दयावी.
रब्बी ज्वारी
परिपक्वता ते काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या ज्वारी पिकाची काढणी/कापणी
करुन घ्यावी. तसेच काढणी झालेल्या पिकाची मळणी करून धांन्यास ऊन देऊन सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी.
मका (रब्बी)
परिपक्वता ते काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या मका (रब्बी) पिकाची काढणी
करुन घ्यावी. तसेच काढणी झालेल्या पिकाची मळणी करून धांन्यास ऊन देऊन सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी.
गहू
परिपक्वता ते काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी/कापणी करुन घ्यावी. तसेच काढणी
झालेल्या पिकाची मळणी करून धांन्यास ऊन देऊन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
उन्हाळी बाजरी
रोपावस्था
उन्हाळी बाजरी पिकास तण नियंत्रणाची कामे करून
पाणी व्यवस्थापन करावे.
कांदा
कंद वाढीची अवस्था
तापमानातील चढउतारामुळे कांदा पिकामध्ये करपा
रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५ ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबा
फुलोरा ते फळधारणा/ फळ वाढीची अवस्था
सद्यस्थितीत तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे
आंबा फळबागेमध्ये फळगळ दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड
(एनएए, ४.५ एसएल) ५.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून पहिली फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना व दुसरी फवारणी फळे गोटीच्या
आकाराची असताना करावी. तसेच आंबा बागेतील फळगळ रोखण्यासाठी बागेत पाण्याच्या
नियमित पाळया दयाव्यात.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तापमानातील चढउतारामुळे भाजीपाला पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
फिप्रोनील १५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १०
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी
देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी
टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा
यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी
शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात.
इतर
सद्यस्थितीत
कमाल तापमानात वाढ होत असून वातावरणातील बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढत आहे. तरी शेतकरी बांधवानी पिकांना व फळबागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
तसेच विविध आच्छादनांचा वापर करावा, जेणेकरुन बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी होवून
पाण्याच्या पाळया कमी होतील.
Comments
Post a Comment